एप्रिल २०२३ पर्यंत सरकारी कामे पेपरलेस !
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : राज्यातील सर्व सरकारी कार्यालये डिजीटल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. येत्या 1 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे, म्हणजेच सर्व कामकाज पेपरलेस होणार असून, त्यामुळे कामाला गती मिळू शकेल.
केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांची आज भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी ही घोषणा केली. ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित झाल्याने कामे वेगाने पूर्ण होऊन सर्व कामे पेपरलेस होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व कार्यालये ई-ऑफिस मोडवर आल्यानंतर अधिकाऱ्यांना सर्व फाईल्स व कागदपत्रे मोबाईलवर पाहता येतील.मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) वतीने अधिकाऱ्यांना सुशासन पुस्तिका तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सुशासन निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राने प्रथम क्रमांक गाठण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.