पोलीस मदत केंद्र घोट येथे जनमैत्री मेळाव्यात शांती दुत यांचा निरोप समारंभ कार्यक्रम सपन्न - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पोलीस मदत केंद्र घोट येथे जनमैत्री मेळाव्यात शांती दुत यांचा निरोप समारंभ कार्यक्रम सपन्न

दि. ०५/१२/२०२२
Vidarbha News India - VNI
पोलीस मदत केंद्र घोट येथे जनमैत्री मेळाव्यात शांती दुत यांचा निरोप समारंभ कार्यक्रम सपन्न 

विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ता.प्रतिनिधी चामोर्शी: दिलीप खोब्रागडे

घोट : जनमैत्री मेळाव्याला उपस्थित झालेल्या शांती दुत यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम काल दि. ४ ला आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास पोमके पोलीस मदत केंद्रामधील अधिकारी व अमलदार उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शांती दुत यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले व शेवटी प्रभारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी पोलीस विभाग कसे आदिवासी बांधवांना नक्षलवाद सारख्या जखडलेल्या दलदलीतुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे मग ते त्यांच्या वर आलेल्या दुःखात सहभागी होऊन असो किंवा दादा लोरा खिडकी सारखे उपक्रम राबवून असो. असे भाषणात मार्गदर्शन करण्यात आले. व सर्व शांती दुत यांना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅंकेट भेटवस्तू म्हणून देण्यात आले, व कार्यक्रमाची संग़ता करण्यात आली.
उपस्थित सर्व शांती दुत यांना जेवन, चहा, पाण्याची सोय करण्यात आली.                                                      

दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी पासुन उपविभागीय स्तरावर जन मैत्री मेळाव्याचे आयोजन जनमैत्री मेळाव्याला उपस्थित झालेल्या शांती दुत यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक ,श्री. अनुज तारे सा अप्पर पोलीस अधीक्षक अभियान गडचिरोली, श्री. कुमार  चिंता सा अप्पर पोलीस अधीक्षक  श्री.  यतीश देशमुख सा अप्पर पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणील गिल्डा सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र घोट येथे जण मैत्री मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले. सदर मेळाव्याला एकुण ५० शांती दुत  हजर आले असुन , मागील ३ दिवसापासून उपस्थित सर्व शांतिदुत यांना सकाळी नास्ता , दोन वेळ चहा , दोन वेळचे जेवण , योगा , आरोग्य तपासणी , खेळ , कृषी मार्गदर्शन, शारीरिक व बौद्धिक मार्गदर्शन  करण्यात आले .
             
                   - सपोनी संदीप रोंढे व टीम     
                              AOP घोट
                                   
                                   

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->