गोंडवाना विद्यापीठाचा रासेयो स्वयंसेवक प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर करणार पथसंचालन - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गोंडवाना विद्यापीठाचा रासेयो स्वयंसेवक प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर करणार पथसंचालन

दि. २१ डिसेंबर २०२२

गोंडवाना विद्यापीठाचा रासेयो स्वयंसेवक प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर करणार पथसंचालन
शुभम कुडमेथे याचे अभिनंदन करतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, आणि संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. श्याम खंडारे तसेच इतर मान्यवर

विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठाचा स्वयंसेवक शुभम कुडमेथे (सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर) यांची  युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार अधीन राष्ट्रीय सेवा योजना द्वारे प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचालनसाठी निवड झालेली असून आचल करंबे (नेवजाबाई हितकरिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी) ही स्वयंसेविका प्रतीक्षा यादीमध्ये आहे. गोंडवाना विद्यापीठ आदिवासी बहुल भागात असले तरी येथील विद्यार्थी हे कोणत्याही स्पर्धेत कमी नाहीत हे या निवडीतून दिसून येते. दरवर्षी कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी पथसंचालन होत असून त्यात राष्ट्रीय सेवा योजना चा संघ सुद्धा सहभागी होत असतो... त्यासाठी संपूर्ण भारतातून जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय व झोनस्तरीय निवड प्रक्रिया होत असते. या सर्व निवड प्रक्रियेत स्वयंसेवकांची शारीरिक चाचणी व सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा चाचणी घेतली जाते. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा ८ स्वयंसेवकांचा संघ कोल्हापूर येथील राज्यस्तरीय निवड शिबिरात सहभागी झालेला होता, यातून शुभम कुडमेथे  व आचल करंबे या दोन स्वयंसेवकांची निवड वेस्ट झोनस्तरीय निवड शिबिरासाठी झालेली होती, या दोन स्वयंसेवकांनी सरदार पटेल विद्यापीठ आनंद, गुजरात येथील शिबिरात सहभाग घेतला त्यातून शुभम ची निवड प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचालनसाठी झालेली असून संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वयंसेवकातून शुभम प्रथम क्रमांकावर आहे.
तसेच आचल चे नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा विद्यापीठाचा स्वयंसेवक पथसंचालनात सहभागी होणार आहे. ही बाब नक्कीच विद्यापीठासाठी गौरवाची आणि अभिमानाची आहे.
या निवडीसाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन, रासेयो संचालक डॉ श्याम खंडारे, तसेच दोन्ही जिल्ह्यातील कार्यक्रम अधिकारी यांनी शुभम चे कौतुक करत अभिनंदन केलेले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->