दि. २९ डिसेंबर २०२२
आ. डॉ. देवरावजी होळी यांनी आजही विधानसभेत उचलला गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघांच्या हल्ल्याचा प्रश्न
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाघांच्या बंदोबस्तासाठी कडकडीची विनंती
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या वाघांच्या हल्ल्याने जिल्ह्यातील नागरिक भयग्रस्त झाले असून नागरिकांना घराबाहेर व शेतीमध्ये जाताना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत असल्याने जिल्ह्यातील या नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याची मागणी राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी विधानसभेत केली.
आतापर्यंत जिल्ह्यात वन्य प्राण्यांनी ५३ हून अधिक निष्पाप लोकांचा बळी घेतलेला असून त्यात सर्वाधिक ५० च्या आसपास बळी वाघांनी घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जर या नरभक्षक वाघांचा बंदोबस्त तातडीने केला नाही तर आणखी जिल्ह्यातील निष्पाप लोकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे जिल्ह्यातील नागरिक अत्यंत भयग्रस्त झाले असून नागरिकांना शेतकऱ्यांना या वाघांपासून संरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.तसेच या वाघामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचेही प्रचंड नुकसान होत आहे त्याचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी यावेळेस विधानसभेत प्रश्नाच्या माध्यमातून राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली.