दि. २८ जानेवारी २०२३
हातांची स्वच्छता महत्वाची आहे; डॉ. वैभव तातावार
- गोंडवाना विद्यापीठात स्वच्छता आणि आरोग्य यावर व्याख्यान
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आपण आजारी पडण्याचं आणि आजार पसरवणे टाळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे हात धुणं. घाण हातांनी जर आपण आपलं नाक किंवा डोळे चोळले तर आपल्याला सहजपणे सर्दी-खोकला होऊ शकतो. त्यामुळं कशाचाही संसर्ग होऊ नये म्हणून आपण स्वतःला हात धुण्याची सवय लावू शकतो. स्वच्छ राहिल्यानं अनेक आजार आणि पोटाचे विकारही टाळू शकतो.त्यामुळे हातांची स्वच्छता महत्त्वाची आहे.
असे प्रतिपादन असे डॉ. वैभव तातावार यांनी केले.गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व संस्थात्मक नवोपक्रम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छता आणि आरोग्य' या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रा.शिल्पा आठवले,डॉ. प्रीती काळे ,संस्थात्मक नवोपक्रम संस्था समन्वयक डॉ. प्रिया गेडाम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. रजनी वाढई तर डॉ. रूपाली आलोने यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.