दि. २६ जानेवारी २०२३
गोंडवाना विद्यापीठात प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : ज्यांचे शिक्षण अर्ध्यावर सुटलेले आहे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून कौशल्य युक्त शिक्षण उपलब्ध करून द्यायचे.
शिक्षणाबरोबरच रोजगार मिळाला पाहिजे. तरच सर्वांगीण विकास साधला जाईल. असे प्रतिपादन गोडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी केले. त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि संविधानिक अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.