प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा संघटनांच्या पदाधिकारी यांची मा.जिल्हा कोशागार अधिकारी यांच्याशी वेतनबील विलंबाबाबत प्रत्यक्ष भेट व चर्चा - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा संघटनांच्या पदाधिकारी यांची मा.जिल्हा कोशागार अधिकारी यांच्याशी वेतनबील विलंबाबाबत प्रत्यक्ष भेट व चर्चा

दि. ०४ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा संघटनांच्या पदाधिकारी यांची मा.जिल्हा कोशागार अधिकारी यांच्याशी वेतनबील विलंबाबाबत प्रत्यक्ष भेट व चर्चा
जिल्हा कोशागार अधिकारी गडचिरोली श्री लक्ष्मण लिंगलोड साहेब यांचेशी चर्चा करतांना जिल्हा शिक्षक संघटनांचे पदाधिकारी

विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा संघटनांच्या पदाधिकारी यांची मा.जिल्हा कोशागार अधिकारी श्री. लक्ष्मण लिंगलोड साहेब यांचेशी जिल्हाकोशागारातुन दरमहा वेतनबील पास होण्यासाठी लागणा-या विलंबाबाबत प्रत्यक्ष भेट व चर्चा दि. ३ जानेवारी २०२३ ला झाली.
लक्ष्मण लिंगालोड साहेब, जिल्हा कोशागार अधिकारी गडचिरोली यांचेशी चामोर्शी पं.स.अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या माहे नोव्हेंबर २०२२ च्या वेतनासंदर्भात तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या दरमहा वेतन बील पास होण्यासाठी विलंब होत असल्याबाबतच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी महाराष्टृ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,जिल्हा सरचिटणीस श्री आशिष धाञक,जिल्हा कोषाध्यक्ष श्री राजेश चिल्लमवार,काॅस्टाृईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर मडावी,श्री देवेंद्र डोहणे,जुनी पेन्शन संघटनेचे सरचिटणीस श्री बापु मुन्घाटे,दुर्गम शिक्षक संघटनेचे श्री डि.एन.पिपरे,श्री राजेश मुर्वतकर,राष्टृवादी शिक्षक संघटनेचे श्री विनोद ब्राम्हणवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. जिल्हा कोशागार अधिकारी श्री लक्ष्मण लिंगालोड साहेब यांनी उपस्थित शिक्षक संघटनाच्या पदाधिकारी यांना यापुढील वेतनबील जिल्हा कोशागार कार्यालयात आल्यानंतर लवकरात लवकर पास करण्याचे आश्वासन दिले.आणि विशेष म्हणजे आजच्या आजच जिल्हाकोशागार कार्यालयातुन माहे नोव्हेंबर २०२२ चामोर्शी तालुक्याचे  वेतन बिल पास झाले असुन लगेच व्हाउचर नंबर सुद्धा मिळालेला आहे. तसेच आजच्या प्रत्यक्ष भेटीत माहे डिसेंबर २०२२ चे वेतन सुद्धा त्वरीत करण्यात यावे अशी मागणी मा.उपमुख्यकार्यकारी अधिकारी साहेब व मा.शिक्षणाधिकारी साहेब(प्राथ.)यांचेकडे प्राथमिक शिक्षक संघटनांच्या जिल्हा पदाधिकारी यानी केलेली आहे.          

त्याचप्रमाणे आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षक-बंधु-भगिनींच्या संदर्भात,शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लावण्यात यावी यासंदर्भात, निवडश्रेणीच्या संदर्भात,श्री प्रदिप बंडावार सर पं.स.मुलचेरा यांच्या वैद्यकीय सबबीवरील रजा संदर्भातील मुद्यांवर मा.शिक्षणाधिकारी श्री विवेक नाकाडे साहेब,सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री धनंजय दुम्पेट्टीवार साहेब यांचेशी आजच्या प्रत्यक्ष भेटीत थोडक्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->