सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती ; ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती ; ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे

दि. २७ जानेवारी २०२३
सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती ; ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे
तीन दिवसीय अमृत कला क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आनंदवनात आत्तापर्यंत कितीतरी कुष्ठरोग्यांवर उपचार आणि सेवा करण्यात आली आहे. समाजाने दुर्लक्षित केलेल्या या कुष्ठरोग्णांच्या सेवेपेक्षा त्यांना आत्मनिर्भर आणि सन्मानित जीवन देण्यासाठी बाबांनी कार्य केले. आजही अंध,अपंग ,कुष्ठरोगी  वेगवेगळ्या  प्रकल्पाशी जुळलेले आहेत. बाबांनी आमच्यासाठी काही केले नाही,पण हा सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती आहे. अशा भावना गोंडवाना विद्यापीठातील अमृत क्रीडा व कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.
२७ ते २९ जानेवारी अशा तीन दिवसीय गोंडवाना विद्यापीठ परिसरात अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे आज विद्यापीठ परिसरात उद्घाटन पार पडले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर प्रमुख अतिथी म्हणून  स्लम सॉकर (झुंड फेम)प्रा. विजय बारसे, प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, नाट्यकलावंत संजय दत्तोजी रामटेके चंद्रपूर , यांची तसेच विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव विज्ञान अधिष्ठाता डॉ.चंद्रमाऊली, नव संशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अनिता लोखंडे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. विजय सिल्लारे, उपाध्यक्ष जितेंद्र अंबागडे, हेमंत बारसागडे, सचिव तथा अधिसभा सदस्य, सतीश पडोळे, विजयकुमार घरत अधिसभा सदस्य, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव, आणि प्रशांत रंदईआदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी नाट्य कलावंत संजय रामटेके म्हणाले ,अमृत म्हणजे संजीवनी .या अमृत महोत्सवाने  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलयं.काही नवं करण्याची संधी त्यांच्यामध्ये मध्ये निर्माण झाली आहे.
कलाकार म्हणून एखादी भूमिका करताना त्या भूमिकेमध्ये पूर्णतः शिरावं लागतं. तेव्हाच आपण त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो. तशीच भुमिका आज तुम्हाला वठवायची आहे. असं ते म्हणाले.
काम करत असताना प्रसिद्धी च्या मागे जाऊ नका ,जग आपोआप आपल्या मागे येईल. शरीर म्हातारे होत असलं तर मन नेहमी तरुण  ठेवावे. २२ वर्षांपूर्वी मी स्लम सॉकर म्हणजेच झोपडपट्टी फुटबॉल ची स्थापना केली आतापर्यंत देशभरात जवळपास अडीच लाख झोपडपट्टीतील मुला मुलींना या मोहिमेतून फुटबॉलचे  प्रशिक्षण मी दिले आहे. असे प्रणेते स्लम सॉकर(झुंड फ्रेम) प्रा. विजय बारसे म्हणाले.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, स्पर्धेमध्ये कुणीतरी जिंकेल आणि कुणीतरी हरेल, एकोप्याने खेळा आणि उत्साहाने खेळा कारण खेळ हा आयुष्याचा उत्सव असतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता लोखंडे , संचालन उपकुलसचिव  डॉ. संदेश सोनुले तर आभार  कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी मानले. या कार्यक्रमाला  सर्व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->