दि. २९ जानेवारी २०२३
खा.अशोक नेते यांच्या निवासी कार्यालयामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती शाहूनगर,विवेकानंद नगर या वार्डातील बूथ क्रमांक ९५ गडचिरोली येथे मन की बात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : खासदार अशोकजी नेते यांच्या निवासी कार्यालयामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शाहू नगर, स्वामी विवेकानंद नगर बुथ क्रमांक ९५ गडचिरोली येथे आज दि.२९ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टी मोर्चा चे प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,उपाध्यक्ष भारतजी खटि,भाजपाचे जेष्ठ नेते रमेशजी भुरसे,जेष्ठ नेते सुधाकरजी येंनगदलवार, प्रदेश सदस्या महिला आघाडी च्या रेखाताई डोळस,माजी न.प.उपाध्यक्ष अरुणजी हरडे, जिल्हा सचिव गीताताई हिंगे,माजी नगर सेविका वर्षाताई शेडमाके,अनिल पोहनकर,डेडूजी राऊत,दतु माकोडे, संजय बारापात्रे,सागर कुंभरे,हर्षल गेडाम, आशिष कोडापे, संजय मांडवगडे, अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमा निमित्यानं गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रात सामाजिक प्रबोधनाचं काम करून सामाजिक दायित्व निर्माण करणारे झाडीपट्टीतील कलावंत डॉ. परशुरामजी खुणे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्याने देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे शतशः आभार खासदार अशोकजी नेते यांनी मानले.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.