थलपथी विजयच्या 'वारिस'च्या कलेक्शनमध्ये ३ दिवसात दुपटीने वाढ, जगभरातून 'इतका' गल्ला जमवत पार केला २०० कोटींचा आकडा - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

थलपथी विजयच्या 'वारिस'च्या कलेक्शनमध्ये ३ दिवसात दुपटीने वाढ, जगभरातून 'इतका' गल्ला जमवत पार केला २०० कोटींचा आकडा

दि.18.01.2023

Vidarbha News India - VNI

थलपथी विजयच्या 'वारिस'च्या कलेक्शनमध्ये ३ दिवसात दुपटीने वाढ, जगभरातून 'इतका' गल्ला जमवत पार केला २०० कोटींचा आकडा

VNI : New Movie Updated

सध्या दक्षिणात्य चित्रपटांचा डंका जगभर वाजताना दिसतोय. एकीकडे 'आरआरआर' चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे, तर दुपारीकडे थलपथी विजयच्या 'वारिस' या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं आहे.

७ दिवसांतच या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.

थलपथी विजयचा ‘वारिस’ चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. इमोशनल फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन यांचे मिश्रण असलेल्या या चित्रपटात विजय पुन्हा एकदा पूर्वीच्या अंदाजात दिसून येत आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेण्डलाच जगभरातून १०० कोटींचा गल्ला जमवला होता. तर पुढील चार दिवसात या चित्रपटाने दुप्पट कमाई केली.

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवरही प्रतिक्रिया देत प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसातच या चित्रपटाने जगभरातून १०३ कोटींची कमाई केली होती. तर आता हा आकडा २०० कोटींच्या पुढे गेला आहे. प्रदर्शनाच्या ७ दिवसांतच या चित्रपटाने जगभरातून २१० कोटी कमावले आहेत.

वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित या चित्रपटात थलपथी विजय एका व्यावसायिकाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. हा सर्वच चित्रपटांना चांगलीच टफ फाईट देताना दिसत आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->