CEO : संवेदनशील अधिकारी दुचाकीवरुन दुर्गम भागात; विद्यार्थ्यांशी संवाद, आढावाही घेतला... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

CEO : संवेदनशील अधिकारी दुचाकीवरुन दुर्गम भागात; विद्यार्थ्यांशी संवाद, आढावाही घेतला...

दि. १० जानेवारी २०२३

Vidarbha News India - VNI

CEO : संवेदनशील अधिकारी दुचाकीवरुन दुर्गम भागात; विद्यार्थ्यांशी संवाद, आढावाही घेतला


विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भामरागड तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा-पल्ली, कसनसूर, प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा व पंचायत समिती भामरागड येथे अचानक देऊन आरोग्य विभाग, अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायत मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.

प्रत्यक्षात कामांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान राज्य सीमेवर वसलेल्या अतिदुर्गम अशा कसनसूर गावाला दुचाकी वाहनाने जाऊन भेट दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गेल्या काही काळात आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास विभागअंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आरोग्यसेवा बळकट करणे, माता बालमृत्यू कमी करणे, आनंददायी शिक्षण प्रणाली अंमलात आणणे व बालकांचे कुपोषण दूर करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मावा-गडचिरोली पालवी, फुलोरा, विशेष आहार योजना आदी उपक्रम जिल्ह्यात राबविले जात आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या समस्या जाणून घेणे व योग्य मार्गदर्शन करणेत्सव भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम पल्ली, कसनसूर आरेवाडा आदी ठिकाणी भेट दिली. भेटी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दुचाकीचा ५ किलोमीटर प्रवास करून कसनसूर गावात सुरू असलेल्या लसीकरण सत्राला भेट दिली. उपस्थित आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी कार्यकर्ता यांच्या कामाचा आढावा घेतला.

लाभार्थींच्या घरी भेट देऊन पालवी उपक्रम, विशेष गोवर लसीकरण मोहीम, हिवताप मोहीम व कुपोषणाबाबत जनतेशी चर्चा केली. गावात प्रसूती मलेरियाचे प्रमाण जास्त असून आरोग्य विभाग पंचायत विभाग व ग्रामपंचायत यांनी संयुक्तिक काम करण्याचे निर्देश दिले. प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडाला भेट देऊन विविध आरोग्यविषयक कामांचा आढावा घेतला. आरोग्य सेवा बळकट करण्याबाबत आदेश दिले. पंचायत समिती- भामरागड भेट दिली. संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्याकडून तालुक्यातील विविध विकासाच्या कामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री उपस्थित होते.

पल्लीतील विद्यार्थ्यांचा घेतला वर्ग

पल्ली येथील आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत पल्लीला भेट दिली. सर्व जोखमीच्या गरोदर माता यांना सर्वकष सेवा देणे. तसेच जिल्हा परिषद शाळा येथील फुलोरा उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तेथील बालकांनी फुलोरा अंतर्गत सादर केलेलं विविध कौशल्य बघून समाधान व्यक्त केले. गावकयांशी चर्चा करून विकास कामाचा आढावा व समस्या जाऊन घेतल्या.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->