हायवे ओलांडणाऱ्या 17 महिलांना SUV ने चिरडले...5 ठार..! - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

हायवे ओलांडणाऱ्या 17 महिलांना SUV ने चिरडले...5 ठार..!

दि. १४.०२.२०२३

Vidarbha News India - VNI

हायवे ओलांडणाऱ्या 17 महिलांना SUV ने चिरडले...5 ठार..!

विदर्भ न्यूज इंडिया

MAHARASHTRA

नाशिक : SUV Sport Utility Vehicles accident महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे भरधाव वेगात आलेल्या एसयूव्हीने 17 महिलांना चिरडले. यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला.

आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. या महिला एका केटरिंग ग्रुपचा भाग होत्या आणि लग्नाच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक करण्यासाठी जात होत्या. चालक फरार झाला आहे. त्याची ओळख अद्याप उघड झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ असलेल्या शिरोली परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. SUV accident पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्याचवेळी महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना ठोकर देऊंन वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून वाहनासह फरार झाला. या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी आहे. जखमी महिलावर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. फरार वाहन चालकाचा खेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->