दि. ३ फेब्रुवारी २०२३
खा. अशोक नेते यांची धान खरेदी अंतर्गत उद्दिष्टे वाढवण्यासंबंधी केंद्रियमंत्री मा.पियुस गोयल यांच्याकडे दिल्ली येथे निवेदनाद्वारे मागणी
विदर्भ न्यूज इंडिया
दिल्ली : खासदार अशोकजी नेते यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत रब्बी उत्पादन हंगाम २०२२-२३ चे धान (तांदूळ) खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयल अन्न प्रक्रिया आणि ग्राहक व्यवहार भारत सरकार नई दिल्ली -०१ यांना दिल्ली येथे निवेदनाद्वारे मागणी करून चर्चा केली.
गडचिरोली- चिमूर हा पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्र आहे. ज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे. रब्बी धानाचे पीक गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि काही पुराव्यांनुसार गडचिरोली जिल्ह्यात घेतले जाते. धान उत्पादनाच्या प्रमाणात धान खरेदीचे उद्दिष्ट अत्यंत कमी असल्याने यांचा शेतकऱ्यांना अनेकदा खरेदी केंद्रावर सामना करावा लागतांना दिसतो.
यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होत असलेली अडचण लक्षात घेता शेतकरी बांधवांचे धान उत्पादन खरेदीचे उद्दिष्ट १२ क्विंटल प्रति एकर म्हणजे ३० क्विंटल प्रति हेक्टर इतके उद्दिष्टे वाढवावे.
याकरिता केंद्रीय मंत्री माननीय पियुषजी गोयल यांना खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी सामाजिक नेते नानाभाऊ नाकाडे, जेसा मोटवानी उपस्थित होते.