जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे शिवजयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे शिवजयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी

                 दि. २०.०२.२०२३               Vidarbha News India - VNI            

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे शिवजयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी                                     
                                 विदर्भ न्यूज इंडिया                                    
गडचिरोली
चामोर्शी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जनतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजयंती म्हणुन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी या शिवजयंती उत्सवाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनराज बुरे,माजी अध्यक्ष विजय राजुरवार,गावातील प्रतिष्ठीत नागरिक सन्माननिय श्री यशवंत माधव मुम्मडवार,शाळेतील सर्व शिक्षकवृंद श्री रघुनाथ भांडेकर,अशोक जुवारे,जगदिश कळाम,राजकुमार कुळसंगे,चंद्रकात वेटे,कमलाकर कोंडावार व शाळेतील विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्टृ माझा..... या राज्यगीताने करण्यात आली. शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती मुरखळा(माल)चे अध्यक्ष श्री धनराज बुरे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री विजय राजुरवार,गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री यशवंत माधव मुम्मडवार हे होते.या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी जनतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला व मार्गदर्शन केले.तसेच काही विद्यार्थ्यांचेही याप्रसंगी भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर यांनी केले.प्रास्ताविकातुन श्री रघुनाथ भांडेकर सर यांनी जनतेचे राजे छञपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या हितासाठी केलल्या लोकोपयोगी कार्याची माहीती उपस्थित विद्यार्थ्यांना करुन दिली.कार्यक्रमाचे संचालन इयत्ता ७ वी तील विद्यार्थी सक्षम रविंद्र बोबाटे यांनी केले.तर आभार श्री राजकुमार कुळसंगे सर  यांनी मानले.शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->