पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शुक्रवार पासून विदर्भ दौर्‍यावर... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शुक्रवार पासून विदर्भ दौर्‍यावर...

दि. १ फेब्रुवारी २०२३
Vidarbha News India - VNI
पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शुक्रवार पासून विदर्भ दौर्‍यावर...

विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी /यवतमाळ : भारत सरकार नोंदणीकृत बहुद्देशीय राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवार पासून विदर्भ दौर्‍यावर येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान यांनी दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा २०२३ सालचा महाराष्ट्र दौरा यवतमाळ पासून सुरू होत आहे. या दौऱ्यात राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम हे विदर्भातील पत्रकारांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. यावेळी होणार्‍या बैठकीत पत्रकार वसाहती, पत्रकार भवन, पत्रकार पेन्शन योजना, पत्रकार कुटुंब हेल्थ इन्शुरन्स, पत्रकार टोल माफी, पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना या बाबत पत्रकार संरक्षण, शासकीय विश्रामगृहात पत्रकारांना मोफत निवासाची व्यवस्था, पत्रकार अधिस्वीकृती साठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या, वार्तांकन करणार्‍या पत्रकारांना शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सन्मानाची वागणूक मिळावी, पत्रकारांना घरकुल योजना व व्यवसायासाठी शासकीय जागा मिळाव्या यासह विविध प्रश्नासाठी राज्यभर करण्यात येणार्‍या तीव्र आंदोलना बाबत  चर्चा करण्यात येईल. यानंतर सबंधित जिल्ह्याचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा रुग्णालय शल्य चिकित्सक, विविध प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सोबत याबाबत चर्चा करणार आहे तसेच पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात लेखी पत्रव्यवहार करणार आहे. शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवार रोजी यवतमाळ शहरात राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ स्थरिय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील व विदर्भ प्रदेश मधील सर्व पत्रकार सभासद उपस्थित राहतील. बैठकी साठी विदर्भातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष संतोष डोमाळे यांनी संघटनेच्या वतीने केले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->