हिंदू-मुस्लिम एक आहेत, कोणतीही जात-पात नाही, वर्णव्यवस्था पंडितांनी बनवली - मोहन भागवतांचे मोठे विधान - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

हिंदू-मुस्लिम एक आहेत, कोणतीही जात-पात नाही, वर्णव्यवस्था पंडितांनी बनवली - मोहन भागवतांचे मोठे विधान

दि. ६ फेब्रुवारी २०२३

Vidarbha News India - VNI

हिंदू-मुस्लिम एक आहेत, कोणतीही जात-पात नाही, वर्णव्यवस्था पंडितांनी बनवली - मोहन भागवतांचे मोठे विधान

विदर्भ न्यूज इंडिया

मुबंई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी जातीवादावर मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की देव नेहमी म्हणतो की माझ्यासाठी सर्व लोक एक आहेत. त्यांच्यापाशी जात-वर्ण नाही, पण पंडितांनी वर्गवारी केली, ते चुकीचे होते.

आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला आहे, त्यामुळे आपल्या देशावर हल्ला झाला. याचा फायदा बाहेरून आलेल्या लोकांनी घेतला, असे भागवत म्हणाले. मुंबईत संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले की, देशात विवेक आणि चेतना एक आहेत, त्यांच्यात काही फरक नाही…फक्त विचार वेगळे आहेत. देशात हिंदू समाजाच्या विनाशाची भीती दिसत आहे का?, असा सवाल त्यांनी केला. कोणताही ब्राह्मण तुम्हाला हे सांगणार नाही. ते तुम्हीच समजून घेतले पाहिजे. आपली उपजीविका म्हणजे समाजाप्रती जबाबदारीही आहे, असे भागवत म्हणाले. जेव्हा प्रत्येक काम समाजासाठी असते तेव्हा काही उच्च, काही नीच, काही वेगळे कसे झाले.

नुसते पोट भरणे हा धर्म नाही –
मोहन भागवत म्हणाले, संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त बोलण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. संत रोहिदास म्हणायचे की, तुमचे काम करा, धर्माप्रमाणे करा. समाज जोडण्याचे काम करा. समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे हा धर्म आहे. फक्त स्वतःचा विचार करून पोट भरणे हा धर्म नाही. यामुळेच समाजातील मोठे लोक संत रोहिदासांचे भक्त बनले.

‘कोणत्याही परिस्थितीत धर्म सोडू नका’ –
आरएसएस प्रमुख म्हणाले की, संत रोहिदास तुलसीदास, कबीर, सूरदास हे विचाराने उच्च होते… म्हणूनच त्यांना संत शिरोमणी म्हणतात. संत रोहिदास कदाचित वादविवादात ब्राह्मणांवर विजय मिळवू शकले नसतील, परंतु त्यांनी लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि त्यांना विश्वास दिला की देव आहे. संत रोहिदासांनी सत्य, करुणा, आंतरिक शुद्धता, अखंड परिश्रम हा मंत्र समाजाला दिला. आजची परिस्थिती लक्षात ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत धर्म सोडू नका. संत रोहिदासांसह सर्व विचारवंतांची सांगण्याची पद्धत थोडी वेगळी होती, परंतु ध्येय नेहमीच एकच होते ते म्हणजे धर्माशी जोडलेले रहा.

मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला –
आरएसएस प्रमुख भागवत म्हणाले की, काशी मंदिर पाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून ‘हिंदू-मुस्लिम सर्व एकाच देवाची मुले आहेत’ असे म्हटले होते. तुमच्या राजवटीत एकाचा छळ होत आहे, ते चुकीचे आहे. प्रत्येकाचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. हे थांबले नाही तर तलवारीने उत्तर देईन, असे शिवाजी महाराजांनी म्हटले असल्याचेही भागवत यांनी सांगितले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->