दि. २२.०२.२०२३
गोंडवाना विद्यापीठात मेगा करिअर अवेअरनेस प्रोग्राम चे आयोजन
पैशांचा अपव्यय न करता आपण कोणती डिग्री घेतो हे महत्त्वाचे आहे; सीएस शंतनू जोग
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेतांना विद्यार्थ्यांना पडणारा सर्वसाधारण प्रश्न आहे की फी किती भरावी लागेल, भाषेमुळे कोर्स करता येईल का, रोज कॉलेजला जावं लागेल का, एक्झाम कधी देता येईल अशी नाना विविध प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात. कंपनी सेक्रेटरी ह्या कोर्ससाठी बारावीनंतर पंधराशे रुपये भरून प्रवेश परीक्षा देता येईल याची पुस्तकेही अभ्यासाला मिळतील.
परीक्षा पास झाल्यानंतर इंटर्नशिप असेल तर पैशाचा अपव्य न करता हा कोर्स करता येईल असे प्रतिपादन सी.एस. शंतनू जोग यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा करिअर अवेअरनेस प्रोग्राम चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर चाप्टर ऑफ आय .सी .एस .आय.चे चेअरमन सीएस खुशाल बजाज, अध्यक्षस्थानी नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार , सी.ए.आनंद सारडा ,आय. सी.एस.आय, स्टडी सेंटर चे समन्वयक डॉ.अनिरुद्ध गचके उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार म्हणाले, बाहेर जाऊन चाकरी करण्यापेक्षा खरा स्कोप इथे आहे. त्यासाठी आपण कोणती डिग्री घेतो आहे ते महत्त्वाचे आहे .कंपनी सेक्रेटरी हा कोर्स अतिशय चांगला आहे. चांगला पगार आहे. रोजगार तयार आहे मुलांनी फक्त अभ्यास करायचा आहे, असे ते म्हणाले.
यावेळी चेअरमन नागपूर, चाप्टर ऑफ आय. सी. एस. आय. सी. एस.चे खुशाल बजाज आणि सी.ए. आनंद सारडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन डॉ. अनिरुद्ध गचके यांनी तर आभार प्रा.उत्तमचंद कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घेतला. विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.