शिखर महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी निनादला गोंडवाना विद्यापीठाचा आसमंत... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

शिखर महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी निनादला गोंडवाना विद्यापीठाचा आसमंत...

दि. ११ फेब्रुवारी २०२३
Vidarbha News India - VNI
शिखर महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी निनादला गोंडवाना विद्यापीठाचा आसमंत
या महोत्सवातून विद्यार्थ्यांनी स्वतः शोध घ्यावा; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधान येते आणि हा उत्साह वर्षभर टिकतो.यात सहभागी होणारा प्रत्येक विद्यार्थी हा राजहंस आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांमध्ये काय सकस आणि निकसआहे हे बघायला पाहिजे. आणि या महोत्सवातून स्वतःचा शोध घेतला पाहिजे असे प्रतिपादन  कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी शिखर महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आविष्कार ,क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव- शिखर २०२२-२३ चे आयोजन १० फेब्रुवारी रोजी ५.३०वा विद्यापीठ परीसरात करण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षस्थाना वरुन  बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन , विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, शिखर महोत्सवाच्या समन्वयक डॉ. रश्मी बंड उपस्थित होत्या.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीपासून शिखर  महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलेआहे. झाडीपट्टी रंगभूमीचा आपला परिसर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, की प्रत्येकाच्या अंगी एक तरी कला असाते. तशाच कलागुणांनी विद्यार्थ्यांचे आयुष्य हे भरलेलं असते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी या शिखर महोत्सवात करायचा आहे.
या प्रसंगी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन म्हणाले,  विद्यार्थ्यी हा विद्यापीठाचा कणा आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास  कसा करता येईल .यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले.
यावेळी प्लेसमेंट सेल बाबत  प्लेसमेंट सेल चे समन्वयक  डॉ.अनिरुद्ध गचके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्लेसमेंट सेलच्या प्रशिक्षणाला नोंदणी करण्याचे आवाहन केले.
या शिखर महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गर्जा महाराष्ट्र माझा या समूहगीताने सांस्कृतिक कार्यक्रमाला दिमाखदार सुरुवात झाली. या समूहगीतासाठी रसिका श्रोत्यांनी टाळ्यांची दाद दिली. एकल आणि समुह  गीत गायनाने सांगितिक वातावरण निर्माण झालं होतं. समूह नृत्यात विद्यार्थ्यांनी  सुंदर आणि दिलखेच  
नृत्य सादर केले. रेला,  गोंधळ, लावणी, पंजाबी नृत्य या सारखे नृत्य प्रकार सादर करून  विद्यार्थ्यांनी  उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मिमिक्री आणि फॅशन शोला सुरुवात झाली. यामध्ये वैयक्तिक तसेच जोडीने विद्यार्थी सहभागी झाले होते .मुला मुलींच्या फॅशन शो च्या स्पर्धेमध्ये वेशभूषेतून भारतात असलेली विविधतेतून एकता दाखवण्यात आली. या कार्यक्रमालाही प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आविष्कार ही स्पर्धा घेण्यात आली. यातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे सादरीकरण केले . आविष्कार स्पर्धेचे परीक्षण नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार यांनी केले तसेच गीतगायन, मिमिक्री, फॅशन शो आणि समुह नृत्य  या स्पर्धांचे परीक्षण डॉ.संदेश सोनुले, प्रा.संध्या येलेकर आणि शितल सुरडकर यांनी केले.  या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी , पालक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  तसेच परिसरातील नागरिकांनी घेतला.
या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रिया गेडाम यांनी केले. संचालन सपना मेश्राम ,सोनाली मडावी तसेच राजेश्वरी कोटा यांनी केले तर आभार डॉ.रूपाली अलोणे यांनी मानले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रिया गेडाम, डॉ.रश्मी बंड, डॉ.रजनी वाढई ,डॉ. नंदकिशोर मने तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
शिखर महोत्सवाचे वैशिष्ट्य
या महोत्सवात  विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गोंडी आणि छत्तीसगढी भाषेतून संचालन केले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->