नॅशनल हाऊसिंग बँकेत 'या' पदांसाठी सुरु आहे नोकरभरती; महिन्याला ३६ हजार ते ५ लाखापर्यंत पगार मिळवण्याची संधी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

नॅशनल हाऊसिंग बँकेत 'या' पदांसाठी सुरु आहे नोकरभरती; महिन्याला ३६ हजार ते ५ लाखापर्यंत पगार मिळवण्याची संधी

दि. ३ फेब्रुवारी २०२३

Vidarbha News India - VNI

नॅशनल हाऊसिंग बँकेत 'या' पदांसाठी सुरु आहे नोकरभरती; महिन्याला ३६ हजार ते ५ लाखापर्यंत पगार मिळवण्याची संधी

National Housing Bank Recruitment 2023: 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'विदर्भ न्यूज इंडिया' (Media VNI) टीम ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

VNI : Job News :

विदर्भ न्यूज इंडिया

नॅशनल हाऊसिंग बँकेतर्फे ३५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) मध्ये अर्थशास्त्रज्ञ, अधिकारी आणि व्यवस्थापन पदांच्या नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. आपणही बँकेत नोकरीसाठी इच्छुक असल्यास खालील तपशील नीट काळजीपूर्वक वाचा.

NHB भरती रिक्त पदांची माहिती

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
मुख्य अर्थतज्ज्ञ1
प्रोटोकॉल अधिकारी1
जनरल मॅनेजर (स्केल – VII)1
जनरल मॅनेजर (स्केल – VI)2
असिस्टंट जनरल मॅनेजर (स्केल V)5
रिजनल मॅनेजर (स्केल IV)8
मॅनेजर (स्केल III)6
डेप्युटी मॅनेजर (स्केल II)10

NHB भरती वयोमर्यादा: (01/01/2023 रोजी पर्यंत)

  • डेप्युटी मॅनेजर (स्केल - II): २३ वर्षे ते ३२ वर्षे
  • मॅनेजर (स्केल – III): २३ वर्षे ते ३५ वर्षे
  • रिजनल मॅनेजर (स्केल IV): ३० वर्षे ते ४५ वर्षे
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (स्केल – V): ३२ वर्षे ते ५० वर्षे
  • डेप्युटी जनरल मॅनेजर (स्केल - VI): ४० वर्षे ते ५५ वर्षे
  • जनरल मॅनेजर (स्केल – VII): ४० वर्षे ते ५५ वर्षे
  • मुख्य अर्थशास्त्रज्ञ: ६२ वर्षे
  • प्रोटोकॉल ऑफिसर: ६४ वर्षे

NHB पोस्टनुसार सॅलरी

  • असिस्टंट जनरल मॅनेजर (स्केल I): ३६,००० रुपयांपासून पुढे
  • रिजनल मॅनेजर (स्केल IV): ७६,००० रुपयांपासून पुढे
  • डेप्युटी जनरल मॅनेजर (स्केल - VI): १ लाखांपासून पुढे
  • मुख्य अर्थशास्त्रज्ञ: 5 लाख प्रति महिना
  • पर्यवेक्षणासाठी अधिकारी: 1 लाख प्रति महिना
  • प्रोटोकॉल ऑफिसर: 0.75 लाख प्रति महिना

NHB भरती पात्रता निकष:

  • CA सह कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • लॉ पदवी.
  • संगणक / MCA मध्ये पदवी.
  • इंजिनियरिंग पदवी.
  • एमबीए.

NHB भरती निवड प्रक्रिया:

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

NHB भरती अर्ज फी:

  • SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी: १७५/- रुपये (केवळ सूचना शुल्क)
  • जनरल / OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी: ८५०/- रुपये
  • फी ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे करावी.

NHB भरती अर्ज कसा करावा?

➢ पात्र उमेदवार केवळ NHB अधिकृत https://nhb.org.in/ वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
➢ उमेदवारांनी मूलभूत तपशील, फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, लिखित घोषणा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी.
➢ ऑनलाइन अर्जांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ०६/०२/२०२३ मध्यरात्रीपर्यंत आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->