Nagpur : नागपुरातील बर्डी उड्डाणपुलावर भरधाव कारची टाटा एसला धडक; 4 महिलांसह 9 जखमी - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

Nagpur : नागपुरातील बर्डी उड्डाणपुलावर भरधाव कारची टाटा एसला धडक; 4 महिलांसह 9 जखमी

दि. 4 फेब्रुवारी 2023

Vidarbha News India - VNI

Nagpur : नागपुरातील बर्डी उड्डाणपुलावर भरधाव कारची टाटा एसला धडक; 4 महिलांसह 9 जखमी

विदर्भ न्यूज इंडिया

Nagpur News 

प्रतिनिधी/नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या (Nagpur Police) हद्दीत येणाऱ्या आदिवासी शहीद गोवारी उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री उशिरा भरधाव क्रेटा कारने टाटा एस वाहनाला जोरदार धडक दिली.

या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. यात 4 महिला आणि काही युवकांचा समावेश आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलावर भरधाव क्रेटा कारने समोरून येणाच्या मालवाहू वाहन टाटा एसला जोरदार धडक दिली.

अपघातात कार चक्काचूर झाली तर टाटा एस वाहन समोर जाऊन उलटले. यात प्रवास करणारे लोक वेटर्सचे काम करणारे असल्याचे सांगितल्या जाते. यातील 4 महिला तसेच 2 युवक गंभीर जखमी झालेत. तर काही महिला बेशुद्ध पडल्या होत्या. टाटा एसचा चालक वाहनातच अडकून पडला होता. त्याला काचा फोडून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

उड्डाणपुल ठरतायं अपघाताचा हॉट स्पॉट

नागपुरातील उड्डाण पुलांवरील अनियंत्रित वाहनांमुळे नागरिकांचा जीव जात असून काही दिवसांपूर्वीच मंगळवारी परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर अनियंत्रित ट्रॅव्हल्सने अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडले होते. या अपघातात तिची मैत्रीणही गंभीर जखमी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सक्करदरा येथील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जीव गेला होता. तसेच सीताबर्डी येथील उड्डाणपुलावरही अशीच घटना घडली होती. मात्र तरी यावर काही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही.

ट्रॅव्हल्स बसच्या वेगाने केला होता घात

काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात, मंगळवारी पुलावर समोरून ट्रॅव्हल्स बस वेगाने आली आणि रुचिका चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली होती. बसचा वेग जास्त असल्याने, दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने मेयो (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) IGGMC हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी रुचिका हिला तपासून मृत घोषित केले, तर नंदिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी (Nagpur Police) या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला होता. उड्डाणपुलांवर अपघातांची मालिका सुरू असूनही यावर प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाय योजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->