Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने काढला नवीन आदेश! जाणून तुम्हालाही होईल आनंद - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने काढला नवीन आदेश! जाणून तुम्हालाही होईल आनंद

दि. ७ फेब्रुवारी २०२३

Vidarbha News India - VNI

Ration Card Latest News : रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने काढला नवीन आदेश! जाणून तुम्हालाही होईल आनंद

Ration Card Latest News : 

विदर्भ न्यूज इंडिया

देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे रेशन कार्डधारकांना कमी दरात गहू आणि तांदूळ दिले जाते. मात्र कोरोना काळापासून सरकार मोफत धान्य वाटप करत आहे.

येत्या २०२४ ची लोकसभा निवडणूक पाहता केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक निर्णय घेत आहे. अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोफत धान्य वाटपाची मुदत २०२४ पर्यंत वाढवली आहे.

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब लोकांसाठी सरकारने रेशनकार्ड योजना सुरु केली आहे. देशातील ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जात आहे.

मात्र केंद्र सरकारकडून वेळोवेळो रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले जातात. आता पुन्हा एकदा सरकारने रेशन कार्डबाबत नवीन आदेश जारी केला आहे. हा आदेश नागरिकांच्या हिताबाबतच आहे.

रेशनकार्ड योजनेमध्ये अनेक अपात्र लोक देखील सहभागी आहेत. जे लोक या योजनेसाठी अपात्र आहेत असे लोक देखील रेशनकार्डवरील अनेक योजनांचा फायदा घेत आहेत. अशा लोकांना रेशनकार्ड सरेंडर करावे लागणार अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तसेच सरकारकडून अशा अपात्र लोकांकडून दंडही आकाराला जाईल असा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने याबाबत कोणतंही निर्णय घेतला नसून कोणाकडूनही दंड आकाराला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारच्या या आदेशामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिधापत्रिका पात्र आणि अपात्र अशा दोघांनाही लाभ मिळत आहे

रेशन कार्ड योजनेत अनेक लोक सामील आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत. मात्र तरीही शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत.

शासनाच्या घोषणेनुसार सध्या अपात्र व पात्र शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्या अशा शिधापत्रिकाधारकांची सरकार लवकरच चौकशी करणार आहे.

शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळते?

कोरोना काळापासून सरकारने देशातील नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. करोडो लोक या योजनेचा फायदा घेत आहेत. सध्या प्रत्येक कार्डधारकाला प्रति युनिट ५ किलो धान्य दिले जात आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->