Steel and Cement Price : घर बांधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठे बदल, पहा आजच्या किमती - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Steel and Cement Price : घर बांधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठे बदल, पहा आजच्या किमती

दि. २२.०२.२०२३

Vidarbha News India - VNI

Steel and Cement Price : घर बांधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठे बदल, पहा आजच्या किमती

विदर्भ न्यूज इंडिया

Steel and Cement Price : वाढत्या महागाईत घर बांधण्याची चांगली संधी मिळत आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना पैशांची मोठी बचत होणार आहे.

त्यामुळे कमी बजेटमध्ये घर तयार होऊ शकते.

सध्या देशात इंधनाचे दर वाढल्याने सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे सुद्धा कठीण होत चालले आहे. दिवसेंदिवस घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तू देखील महाग होत आहेत.

काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र सध्या मागणी कमी असल्याने पुन्हा त्यांच्या दरात घसरण झाली आहे. मात्र लवकरच स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळ्यात बांधकाम क्षेत्रातील कामाची गती वाढते आणि स्टील आणि सिमेंटची मागणी देखील वाढते. मागणीत वाढ झाली की दरही वाढतात. त्यामुळे सध्या स्टील आणि सिमेंट खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

स्टील आणि सिमेंटच्या दरात सतत चढ उतार होत असतात. त्यांच्या किमती कधी वाढतात तर कधी कमी होतात. मात्र सध्या तुमच्या बजेटमध्ये घर बांधण्याची चांगली संधी मिळत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव खूपच कमी आहे

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्टीलच्या दरात घट झाली आहे. गेल्या वर्षी सिमेंटचे भावही ४०० रुपयांच्या पुढे गेले होते. घरामध्ये वापरल्या जाणार्‍या स्टील आणि सिमेंटच्या किमती वेळोवेळी वाढत आणि कमी होत राहतात. गेल्या 6 महिन्यांत स्टीलच्या किमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

प्रमुख शहरातील स्टीलचे दर

मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56600 रुपये प्रति टन 22-February-23
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51600 रुपये प्रति टन 22-February-23
दिल्ली दिल्ली TMT 12mm 53400 रुपये प्रति टन 22-February-23
चेन्नई तामिळनाडू TMT 12mm 54500 रुपये प्रति टन 22-February-23

सिमेंट नवीन दर

सध्या सिमेंट आणि स्टील स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये देखील तुमचे घर पूर्ण होऊ शकते. सध्या स्टीलचा दर 56600 रुपये प्रति टन इतका आहे. तर सिमेंटचे दर प्रति बॅग ३४० ते ४०० रुपये सुरु आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->