डीएडचा अभ्यासक्रम बंद; शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना बीएड करणे बंधनकारक - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

डीएडचा अभ्यासक्रम बंद; शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना बीएड करणे बंधनकारक

दि. 3.04.2023

MEDIA VNI

डीएडचा अभ्यासक्रम बंद; शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना बीएड करणे बंधनकारक

मीडिया वी.एन.आय : 

केंद्रातील मोदी सरकारने देशभरात लागू केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला शिंदे-फडणवीस सरकारने मान्यता दिल्यामुळे डीएलचा अभ्यासक्रम कायमचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डीएडचा अभ्यासक्रम आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रद्द झाल्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना आता बीएड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीएड बंद केल्यामुळे शिक्षक होण्याचा शॉर्टकप संपला आहे. उमेदवारांना आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन बीएड करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आता बीएडच्या अभ्यासक्रमात स्पेशलायझेशनचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नव्या धोरणाची अंमलबजावणी होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे बीएडच्या विद्यार्थ्यांना चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांची इंटर्नशिप करणेदेखील अनिवार्य असणार आहे. उमेदवाराला ज्या विषयात आवड आहे, त्या विषयात तो इंटर्नशिप करू शकतो. बारावीनंतर नव्याने बीएडच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्त्यांसाठीच हा नवा पॅटर्न लागू होणार आहे. सध्या बीएडचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर या धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाही.

शिक्षणशास्त्र विषय अनिवार्य
याआधी शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना बीएड पदवी पूर्ण करण्यासाठी लागणारा पाच वर्षांचा कालावधी आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार सात वर्षांचा कालावधी लागणार आहे. याशिवाय विषयनिवडीचेही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य असणार आहे. बीएडच्या अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणशास्त्र हा विषय अनिवार्य असेल. मोदी सरकारने लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांना वेतनवाढ आणि भत्ता देण्याबाबत शिफारसी करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवी शैक्षणिक प्रणाली लागू होत असल्यामुळे त्यावरून तर्कवितर्क लावले जात आहे.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->