गोंडवाना विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थी मेळावा संपन्न - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गोंडवाना विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

दि. 13.04.2023
MEDIA VNI
गोंडवाना विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थी मेळावा संपन्न 

- ज्ञानसंवर्धन, भविष्यकालीन योजना, नवे बदल आणि भावनिक ऋणानुबंध एका सूत्रात जोडले जातात- प्र-कूलगुरु डॉ. श्रीराम कावळे

मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : प्रत्येकाने पास झाल्यानंतर आपली नोंदणी गोंडवन या आजी-माजी विद्यार्थी  संघटनेला केली पाहिजे.विविध सामाजिक  कार्य ,स्पर्धा परीक्षेचे क्लासेस सुद्धा याद्वारे चालवता येतील. चांगल्या सांस्कृतिक कार्यकरिणीची, रचनात्मक कार्य करण्याचे येथील विद्यार्थ्यांना गरज आहे. यासाठी भरीव योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. माजी विद्यार्थी मेळाव्यातून ज्ञानसंवर्धन, भविष्यकालीन योजना, नवे बदल आणि भावनिक ऋणानुबंध एका सूत्रात जोडले जातात, असे प्रतिपादन प्र-कूलगुरु डॉ. श्रीराम कावळे  यांनी केले. ही संघटना आमच्या विद्यापीठासाठी  भूषणावाह आहे.असेही ते म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठात गोंडवन या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा मेळावा आज विद्यापीठ सभागृहात पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. याप्रसंगी मंचावर संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ.अनिता लोखंडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विवेक जोशी ,समन्वयक प्रमोद जावरे ,गोंडवन या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव सूरज तरारे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.विवेक जोशी म्हणाले, आजी- माजी विद्यार्थी  संघटनेला  कसे समृद्ध करू शकतो .याचा विचार केला तर ती अधिक चांगली नावारूपाला येऊ शकते असे ते म्हणाले.
संचालक शारीरिक शिक्षण विभाग  डॉ. अनिता लोखंडे म्हणाल्या, आजी- माझी विद्यार्थ्यांशी जोडलेले ऋणानुबंध हे कायम टिकणारे असतात. माजी विद्यार्थाच्या काही सुचना असतील तर त्यांनी सांगाव्यात असे ही त्या म्हणाल्या.
या मेळाव्यात माजी विद्यार्थी रुची राऊत, राजेश खोब्रागडे, पंकज नंदगिरिवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ.प्रमोद जावरे यांनी केले तर संचालन प्रा.डॉ. सविता साधमवार  यांनी तर आभार संघटनेचे सचिव सुरज तरारे यांनी मानले.
या मेळाव्याला आजी - माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->