दि. 25.04.2023
गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची भूमिका मोलाची - डॉ. सुखदेव थोरात
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र बाबासाहेबांच्या झोकाळलेल्या विचारांवर प्रकाश टाकेल- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले आहेत. शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. दबलेल्यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे.
आज ७५ वर्षानंतर हे आपल्याला मान्य आहे की त्यांचे अर्थविषयक विचार किती खरे आहे.
बाबासाहेबांचा विचार अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अध्यासन केंद्राच्या भूमिका मोलाची आहे असे प्रतिपादन माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग तथा सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी गोंडवाना विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी केले. यावेळी ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे आर्थिक विचार या विषयावर बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आकाशवाणीचे अ श्रेणीचे कलाकार अनिल खोब्रागडे यांच्या अभिवादनपर गीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रा. अनिल खोब्रागडे आणि सुखदेव थोरात यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बाबासाहेबांचे अर्थ विषय विचार, शेतकऱ्यांच्या समस्या, जाती जातील भेद, आदिवासींचे प्रश्न, या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे ,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र हे अतिशय उच्च दर्जाचे अध्यासन केंद्र राहील. त्यातून फेलोशिप, स्कॉलरशिप सुद्धा आम्ही देणार आहोत. अध्यासनाला आर्थिक विवंचना कधीच पडू देणार नाही. बाबासाहेबांच्या झोकाळलेल्या विचारांवर प्रकाश टाकून ते किती कालातीत आहे.
खऱ्या अर्थाने ज्ञान निर्मिती हा विद्यापीठाचा उद्देश आहे.असे ते म्हणाले.
यावेळी प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी केलेले कार्य रुजविण्यासाठी या अध्यासन केंद्राच्या निर्मिती झालेली आहे. दुर्मिळ असे बाबासाहेबाचे ग्रंथ आहे. त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल यासाठीच अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अध्यासन केंद्राचा अहवाल शासनाला सादर करून आणखी पुढे याला कसे नेता येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनावरे, दूरदृषप्रणाली द्वारे उपस्थित होते. त्यांनीही बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकला आणि बाबा साहेबांचे विचार विद्यार्थ्यांसाठी कसे महत्त्वाचे आहे. याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुले आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिलीप बारसागडे यांनी केले. संचालन शिल्पा आठवले यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मानले. या कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक प्रकाश मानकर, ज्येष्ठ पत्रकार रोहितदास राऊत, जयंत निमगडे यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या प्रमुख प्रा.डॉ.प्रीती काळे,प्रा.डॉ. दिलिप बारसागडे, डॉ.नंदकिशोर मने, डॉ.विनायक शिंदे, डॉ. उत्तमचंद कांबळे, डॉ .प्रिया गेडाम यांनी परिश्रम घेतले.