विद्यार्थ्यांकडून गोंडवाना विद्यापीठ GST जीएसटी शुल्क आकारणार नाही... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

विद्यार्थ्यांकडून गोंडवाना विद्यापीठ GST जीएसटी शुल्क आकारणार नाही...

दि. 05.04.2023
MEDIA VNI
विद्यार्थ्यांकडून गोंडवाना विद्यापीठ GST जीएसटी शुल्क आकारणार नाही...
- शासनाच्या जीएसटी विभागाकडून आलेल्या पत्रानुसारच गोंडवाना विद्यापीठाने काढले परिपत्रक

मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि.३ एप्रिल रोजी वस्तू व सेवा कर या संदर्भात परिपत्रक प्रकाशित करण्यात आले. या परिपत्रकाच्या अनुषंगाने  विद्यापीठात जमा करण्यात येणारे निरंतर संलग्निकरण, वार्षिक संलग्निकरण ,कायम संलग्निकरण, नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यासक्रम बाबतचे शुल्क, ऑनलाईन संलग्निकरण प्रक्रियेचे शुल्क, विद्यापीठात उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निरंतर  वार्षिक संलग्निकरण करण्यासाठी उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निविदा अर्जाचे शुल्क  इत्यांदीवर लावण्यात आलेल्या १८ %वस्तू व सेवा कराचा( GST) शुल्काचा भरणा शैक्षणिक सत्र २०२३- २४ पासून गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना भरावयाचा असून सदर शुल्काचा विद्यार्थ्यांवर कोणताही आर्थिक भुर्दंड बसवलेला नाही. विद्यार्थ्यांना भरावयाच्या शुल्कावर कोणत्याही प्रकारचे वस्तू व सेवा कर शुल्क गोंडवाना विद्यापिठाकडून विद्यार्थ्यांवर आकारण्यात आलेले नाही.तसे GST विभागाचे निर्देश नाहीत.
दिनांक २१ जानेवारी२०२३ रोजी भारत सरकारचे वित्त मंत्रालय, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांचे महसूल विभाग, नागपूर -1 जीएसटी भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर यांच्या कडून सलंग्नित महाविद्यालयाना निरंतर संलग्निकरण ,वार्षिक संलग्निकरण , कायम संलग्निकरण  नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यासक्रम बाबत शुल्क, ऑनलाईन  संलग्निकरण प्रक्रियेचे शुल्क ,विद्यापीठात उशिरा भरण्यात येणारे शुल्क, निरंतर व वार्षिक संलग्निकरण करण्यासाठी उशिरा भरण्यात येणारे शुल्क ,निविदा अर्जाचे शुल्क इत्यांदीवर लावण्यात आलेल्या १८ %वस्तू व सेवा कराचा( GST) शुल्काचा २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी करावा तसेच  तसेच यावर व्याज व पेनाल्टी  सुद्धा आकारण्यात आली. या बाबतचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले होते. सदर शुल्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठात सुद्धा लागू करण्यात येत आहे. अशी माहीती प्राप्त झालेली आहे.
त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत संलग्नित महाविद्यालयांवर विविध शुल्क भरणा करतांना १८% वस्तू व सेवा कर लागू करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी 3 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकार्‍यांनी एक परिपत्रक काढले. त्यात सर्व सलग्नित महाविद्यालयांना संलग्निकरण शुल्कासह विविध शुल्क भरताना १८% वस्तू व सेवा कर भरावा लागणार असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लावण्यात आलेले नाही. विद्यार्थी हा विद्यापीठाचा कणा आहे. विद्यापीठाने सदोदित विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. याची सर्व विद्यार्थी पालक आणि प्राचार्य तसेच संस्थाचालकांनी नोंद घ्यावी असे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे ,प्र-कूलगुरु डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन तसेच वित्त व लेखा अधिकारी डॉ. चंद्रमौली यांनी कळविले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->