पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; RBI आरबीआयचा मोठा निर्णय... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; RBI आरबीआयचा मोठा निर्णय...

दि. 19.05.2023

MEDIA VNI

पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; RBI आरबीआयचा मोठा निर्णय...

मीडिया वी.एन.आय :

2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.

देशात ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. तेव्हापासूनच २ हजार रुपयांच्या नोटेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

अखेर आज रिझर्व्ह बँकेने घोषणा केली की, २ हजार रुपयांच्या नोटा आता चलनात आणू नयेत.

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिला आहे की, बँकांनी २ हजार रुपयांची नोट ग्राहकांना देऊ नये. ती चलनात आणू नये. येत्या २३ मे पासून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून मिळणार आहेत.

जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजाराच्या नोटा या बँकेतून बदलून मिळू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. येत्या ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. म्हणजेच, ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या वैध असतील. त्यापुढे त्या अवैध असतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

दोन हजार रुपयांची नोट कधी आली चलनात

भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता.त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री 8 वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता.

रात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->