१२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी भरती, ९२ हजारांहून अधिक पगार मिळणार... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

१२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी भरती, ९२ हजारांहून अधिक पगार मिळणार...

दि.19.05.2023
MEDIA VNI 

१२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कर्मचारी निवड आयोगात 'या' पदांसाठी भरती, ९२ हजारांहून अधिक पगार मिळणार

Staff Selection Commission: JOB NEWS

मीडिया वी.एन.आय :

कर्मचारी निवड आयोगातर्फे संयुक्त उच्च माध्यमिक स्तराकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत कर्मचारी निवड आयोगात काही जागांसाठीची भरती केली जाणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जून २०२३ ही आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ –

एकूण रिक्त जागा : १६००

पदाचे नाव –

  • कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
  • डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
  • डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड 'A'

शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठामधून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा पास केलेली असणं आवश्यक.

डेटा एंट्री ऑपरेटर – या पदाकरीता इच्छुक उमेवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयाबरोबरच विज्ञान शाखेत १२ वी पास किंवा समकक्ष.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते २७ वर्षांपर्यंत असावं.

  • SC/ST साठी ५ तर ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे सूट.

अर्ज शुल्क – १०० रुपये

  • SC/ST/PWD/ExSM/ महिला – फी नाही.

पगार – निवडलेल्या उमेदवारांना पोस्टनुसार १९ हजारांपासून ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जून २०२३

अधिकृत संकेतस्थळ – ssc.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी ( https://drive.google.com/file/d/1W0jldprUZpAkFhIrdiwdTKSb6FWHPfH9/view) या लिंकवर क्लिक करा

असा करा अर्ज –

  • सर्व प्रथम विभागाच्या https://ssc.nic.in/ या वेबसाइटवर जा.
  • मेनू बारमध्ये भरती किंवा करिअर पर्याय निवडा.
  • कर्मचारी निवड आयोग भरती जाहिरात शोधा आणि डाउनलोड करा.
  • सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, सूचनांनुसार अर्जामध्ये माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो इत्यादी अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.
  • अर्ज सबमिट करा.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->