Weird : जगातील असं गाव जिथे कार-बाईक नाही, तर फक्त बोट विकत घेतात लोक - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Weird : जगातील असं गाव जिथे कार-बाईक नाही, तर फक्त बोट विकत घेतात लोक

दि. 06.05.2023

MEDIA VNI 

Weird : जगातील असं गाव जिथे कार-बाईक नाही, तर फक्त बोट विकत घेतात लोक

मीडिया वी.एन.आय : 

नेदरलँड :  गाव म्हटलं की लोकांना आठवते ती हिरवळ, लहान आणि कच्चे रस्ते, शेती, विहिर, गाय-बैल इत्यादी.

रस्ते वेगवेगळ्या गावांना जोडं ज्यामुळे दळवळणाचं काम सोपं होतं. कच्चे रस्तो असोत किंवा डांबरी पण रस्ते हे असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत, ज्या गावात एकही रस्ताच नाही.

एक असं गाव आहे जिथे रस्ताच नाही. ज्यामुळे येथील लोक बाईक किंवा कार विकतच घेत नाहीत. त्याऐवजी हे लोक विकत घेतात बोट. कारण इथे प्रवास करण्यासाठी डांबरी रस्त्याऐवजी वापरला जातो पाण्यातील मार्ग. आम्ही बोलत आहोत नेदरलँडमधील गिथॉर्न या छोट्याशा गावाबद्दल.

या गावात पोहोचण्यासाठी किंवा कुठेही जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे पाण्याचा. नेदरलँडमध्ये वसलेल्या गिथॉर्न या छोट्याशा गावाची जगभरात चर्चा होत आहे. हे गाव खूप सुंदर आहे.

या गावाच्या सैंदर्यातेमुळे याला नेदरलँड्सचे व्हेनिस देखील म्हटले जाते. येथे वाहान नसल्यामुळे पॉल्यूशन देखील होत नाही आणि हेच कारण आहे की या गावाचं हिरवळ टिकून आहे.

या गावात तुम्हाला एकही रस्ता सापडणार नाही. रस्त्याअभावी स्थानिक नागरिक वाहन खरेदी करत नाहीत. येथे फक्त बोट चालते. ये-जा करण्यासाठी लोक बोटीचा वापर करतात. हे अनोखे गाव पाहण्यासाठी लोक लांबून येतात. हे गाव जगभर प्रसिद्ध आहे.

जगातील प्रत्येक शहर प्रदूषणाच्या विळख्यात आहे, पण नेदरलँडच्या या गावात प्रदूषणाचा नामोनिशान नाही. वाहने नसल्यामुळे हॉर्नचा आवाज येत नाही. त्यामुळे येथील लोक शांततेत जगतात.

येथे अनेक लहान लाकडी पूल बांधले आहेत. त्यांच्या खालून जाणारी बोट मोहक दिसते. या गावात 180 पूल आहेत. यागावची एकूण लोकसंख्या 30 हजारच्या आसपास आहे. इथल्या प्रत्येक कुटुंबाची स्वतःची एक बोट आहे. बोटीशिवाय या ठिकाणी जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->