सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर

दि. 30.05.2023

MEDIA VNI

सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर

Farmers of the state will get tractors (image google)

मीडिया वी.एन.आय : 

शेतकऱ्यांनी शेती मशागतीचा खर्च वाढल्याने सरकारच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी केली आहे.

यासाठी राज्यातील तब्बल 15 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. मात्र शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने 2023-24 मध्ये राज्यातील फक्त 25 हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे.

यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीकामांसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर सुरू केल्यामुळे पुढील काही काळात बैल जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने राज्यातील १५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख रुपयांची सबसिडी दिली जाते.

उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर कंपनीला शेतकरी भरतात. खताबरोबरच आता शेती मशागतीचा खर्च महागला आहे. भाड्याच्या ट्रॅक्टरला नांगरणीसाठी एकरी बावीसशे रुपये, तर कोळपणी, फणासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतात. स्वत:चाच ट्रॅक्टर असल्यास तेवढा खर्च होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे.

त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आता 'मागेल त्याला शेततळे' या योजनेतून अर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. ट्रॅक्टर हे कमी वेळेत जास्त काम करून देणारे यंत्र आहे. यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. तसेच ट्रॅक्टरला शेतीसाठी लागणारी अनेक प्रकारची यंत्रे जोडता येतात.

यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर सोयीस्कर पडतो. तसेच शेतीच्या कामासाठी मजूर न मिळण्याच्या समस्येवर देखील ट्रॅक्टर उत्तम उपाय आहे. सध्या ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करत आहेत.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->