535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला, पाहताच लोकांनी गर्दी केली अन् मग... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला, पाहताच लोकांनी गर्दी केली अन् मग...

दि. 18.05.2023

MEDIA VNI

535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला, पाहताच लोकांनी गर्दी केली अन् मग...

मीडिया वी.एन.आय : 

चेन्नई :  तामिळनाडूतील चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये रस्त्यातच बिघाड झाला. बुधवारी या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला, की '535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारं वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना रस्त्यातच बंद पडलं. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.' या प्रकरणाची माहिती मिळताच क्रोमपेट पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत वाहनातील लोकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

ट्रकच्या आसपास पोलीस पोहोचल्यावर लोकांनीही आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली. रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ लागली.

तांबरमचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन हेही पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. चेन्नई येथून दोन ट्रक रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, वाटेत एका ट्रकचे इंजिन बिघडले. या भोवती मोठी गर्दी जमू लागली. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. ट्रकमधून धूर निघू लागल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर तपासणी केली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं आढळून आलं. दोन्ही ट्रकच्या आजूबाजूला मोठा जमाव असल्याचं पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रक जवळच्या कॅम्पसमध्ये नेले. यादरम्यान ट्रकचं इंजिन दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकला पाचारण करण्यात आलं, मात्र ट्रक दुरुस्त होऊ शकला नाही. शेवटी, दोन्ही ट्रक दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने परत ओढून आरबीआयकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->