राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ; लेखन - प्रवीण मुंजमकार - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ; लेखन - प्रवीण मुंजमकार

दि.20.03.2023
MEDIA VNI
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ; लेखन - प्रवीण मुंजमकार
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2023- 24 पासून होत आहे. त्या दृष्टीने इयत्ता पहिलीपासूनच याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर याचा आराखडा पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये पाच वर्षाचे शिक्षण हे पूर्व प्राथमिक शिक्षण असणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये शाळांतील अभ्यासक्रमातील आराखड्याचे बदलते स्वरूप आपण समजून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यशस्वीपणे राबवण्यासाठी शासनाच्या वतीने सुकाणू समितीची निर्मिती करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे चे माजी कुलगुरू प्रोफेसर करमरकर सर हे आहेत. डॉ. रवींद्र कुलकर्णी रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बीए, बी कॉम, बीएससी या पारंपारिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील संलग्नित महाविद्यालयामध्ये डी एस सी पॅटर्न नुसार अभ्यासक्रम आराखडा निर्मिती करण्याचे काम प्रत्येक विद्यापीठात सुरू आहे.
या पॅटर्ननुसार 
1.एक मेजर आणि एक मायनर विषय विद्यार्थ्याला निवडता येणार आहे.
2.डीएससी पॅटर्ननुसार मेजर कोर्सेस 50% क्रेडिट आणि मायनर कोर्सेस 20% क्रेडिट आणि इतर कोर्सेस 30 टक्के क्रेडिटचे असणार आहेत.
3. प्रत्येक सत्रामध्ये किमान 20 क्रेडिटचा अभ्यासक्रम तर जास्तीत जास्त 22 क्रेडिटचा अभ्यासक्रम असणार आहे.
4.मेजर कोर्सेस मध्ये विद्यार्थ्याला ज्या विद्या शाखेमध्ये शिकवायचे शिकावयाचे आहे त्यातील एक विषय निवडता येईल तर मायनर कोर्सेस मध्ये त्याच विद्या शाखेमधील मेजर कोर्स वगळता इतर विषय मायनर कोर्स म्हणून निवडता येईल.
5.याशिवाय 30 टक्के क्रेडिट मध्ये इतर कोर्सेस असणार आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस चा समावेश आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने जेनेरिक इलेक्टिव्ह कोर्सेस म्हणजेच विद्यार्थी ज्या विषयात पदवी प्राप्त करणार आहे त्याच विषयाचे सखोल अध्ययन करणारे कोर्सेस सदर विद्यार्थ्यास निवडावे लागणार आहेत. 
6.तर ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस म्हणजे विद्यार्थी ज्या शाखेमध्ये पदवी घेत आहे ती शाखा सोडून इतर शाखेचे विषय विद्यार्थ्यांना निवडावे लागणार आहेत. त्याशिवाय व्यावसायिक कौशल्य कोर्सेस क्षमता विकसन कोर्सेस, इंडियन नॉलेज सिस्टीम, मूल्यशिक्षण यावर आधारित कोर्सेस, संशोधन विषयक प्रकल्प, संशोधन विषयी मार्गदर्शन करणारे विषय, इंटरनशिप अप्रेंटिसशिप तसेच कम्युनिटी एंगेजमेंट अँड सर्विसेस यासंदर्भातील कोर्सेस या सर्वांचा समावेश 30 टक्के क्रेडिट मध्ये करण्यात आलेला आहे.
अशा सर्व कोर्सेस तथा विषयांचा समावेश असणारे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ठरणार आहे. सदर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अशा सर्व बाबींचा समावेश करून विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य विद्यार्थ्यांना संपादित करता यावीत हा त्यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू मांडण्यात आलेला आहे.  अशाच पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेली बीएड पदवी अभ्यासक्रम जसे की 
1. एक वर्षाचा बीएड अभ्यासक्रम 
2. दोन वर्षाचा बीएड अभ्यासक्रम 
3. चार वर्षाचा बीएड अभ्यासक्रम 
     
यासंदर्भात पुनर्रचना करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचे प्रतिबिंब त्यात दिसणार आहे. आपण सर्व शिक्षक प्रशिक्षक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेले या मूलभूत संकल्पनाचे आकलन करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या बीएड अभ्यासक्रमा संदर्भात पुनर्रचना होताना त्याचे लवकर आकलन करणे सोयीचे होईल. याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये चार वर्षा चा पदवीचा अभ्यासक्रम अंतर्भूत केलेला आहे आणि पदवीचे चौथ्या वर्षाचा अभ्यासक्रम हा पदवत्तर पदवीच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला समतुल्य असा राहणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मल्टिपल एन्ट्रीआणि मल्टिपल एक्झिट या प्रकारचा आहे. म्हणजे विद्यार्थी केव्हाही सदर अभ्यासक्रमात एन्ट्री करू शकतो किंवा बाहेरही पडू शकतो. ज्यावेळी विद्यार्थी प्रथम वर्षानंतर बाहेर पडेल त्यावेळी त्याला सर्टिफिकेट मिळेल, द्वितीय वर्ष पूर्ण करून बाहेर पडल्यास डिप्लोमा मिळेल आणि तृतीय वर्ष करून बाहेर पडल्यास पदवी मिळेल आणि चार वर्षानंतर संशोधन अथवा ऑनर्स यापैकी एक प्रकारची पदवी मिळेल. या सर्व बाबीचा विचार करता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अधिकाधिक विद्यार्थी केंद्र आणि विद्यार्थ्यांना अकॅडमी बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट जमा करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. शिक्षक शिक्षणाचा एकात्मिक अभ्यासक्रम तयार करताना म्हणजेच बीए बीएड, बीएससी बीएड किंवा बीकॉम बीएड हे एकात्मिक अभ्यासक्रम तयार करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेली सर्व वैशिष्ट्ये त्यामध्ये समाविष्ट करण्यात येतील. आपल्या शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमाची शिखर संस्था NCTE त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित असलेली सर्व वैशिष्ट्ये अंतर्भूत असणारा एकात्मिक शिक्षक शिक्षणाचा अभ्यासक्रम लवकरच पुढील काळात आपणास पहावयास मिळेल. त्याची अंमलबजावणी करण्याची आव्हानात्मक कार्य आपण सर्व शिक्षक शिक्षकांना करायचा आहे. त्यासाठी आपण अभ्यासपूर्णरित्या तयार असणे गरजेचे आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या सर्वांना शुभेच्छा!
 
लेखन - श्री. प्रवीण यादव मुंजमकर (शिक्षक)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडधा,जिल्हा गडचिरोली.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->