Manipur: महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना होणार फाशीची शिक्षा? - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Manipur: महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना होणार फाशीची शिक्षा?

दि. 20.07.2023

MEDIA VNI 

Manipur: महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना होणार फाशीची शिक्षा?

मीडिया वी. एन.आय : 

इंफाळ : मणिपूरमधील घटनेची स्वतःहून दखल घेत, मणिपूर पोलिसांनी कारवाई केली आणि आज सकाळी पहिली अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याची आम्ही खात्री करू, ज्यामध्ये फाशीच्या शिक्षेची शक्‍यताही विचारात घेतली जाईल, असे प्रतिपादन, राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी केले आहे.

बिरेन पुढे म्हणाले की, काल रात्री 1.30 च्या सुमारास मुख्य गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. आम्ही व्हिडिओ पाहिला आणि मला खूप वाईट वाटले, हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. मी ताबडतोब पोलिसांना गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल.

सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड चिंतीत –

मणिपूरमधील दोन महिलांच्या न्यूड व्हिडिओवर सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांनी चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्राला सांगितले की, व्हिडिओ पाहून आम्ही खूप व्यथित झालो आहोत. दोषींवर कठोर कारवाई करावी. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे आणि याप्रकरणी केंद्राकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाबाबत केंद्र आणि मणिपूर राज्य सरकारने काय पावले उचलली आहेत, अशी विचारणा सरन्यायाधिशांनी केली आहे.

न्या. चंद्रचुड म्हणाले की, महिलांच्या हक्काबाबत घडलेला हा प्रकार अंत:करणाला हादरवून सोडणारा आहे. हे संविधानाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. लोकशाहीत अशा घटना कदापीही मान्य होऊ शकत नाहीत. येत्या शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
न्या. चंद्रचुड पुढे म्हणाले की, मणिपूरमधील लैंगिक छळ आणि हिंसाचाराच्या संदर्भात काल समोर आलेल्या व्हिडिओमुळे न्यायालय अत्यंत अस्वस्थ आहे. प्रसारमाध्यमांमध्ये दिसणारे व्हिज्युअल गंभीर हिंसा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन दर्शवतात. अशा वातावरणात महिलांचा हिंसाचाराचे साधन म्हणून वापर करणे अस्वीकारार्ह आहे. दोषींना पकडण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती न्यायालयाला दिली जावी, असे आमचे मत आहे.

कठोरात कठोर शिक्षा होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मणिपूरमध्ये जे घडले ते संपूर्ण देशाला अतिशय लज्जास्पद आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ते त्यांच्या राज्यातील माता आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे. या घटनेबाबत मी तुम्हाला खात्री देतो की, जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. मणिपूरमध्ये महिलांबाबत जे घडले ते कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी योग्य नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या व्हिडिओ प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->