दि. 07.08.2023
MEDIA VNI
Gadchiroli News: सुरजागड लोहखाणीत मोठी दुर्घटना! उत्खनन करणारे वाहन कोसळले; अभियंत्यासह तिघांचा मृत्यू.!
मीडिया वी. एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखाण उत्खनन करताना भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असा तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लोह प्रकल्पात काल (रविवारी 6 ऑगस्ट) संध्याकाळच्या ही मोठी दुर्घटना समोर आली आहे. उत्खननाचे काम सुरू असताना नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर जोरदार कोसळला. त्यामुळे गाडीतील पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तिघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये सोनल रामगीरवार या अभियंत्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. दरम्यान, हरियाणातील मृत कामगारांची ओळख अद्याप पटलेली नसून दुर्घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मजुरांनी आणि तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या पोलिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Gadchiroli News , Marathi News, Surjagad, Etapalli, Maharashtra