गोंडवाना विद्यापीठाचे नॅकच्या टीमने केले मूल्याकंन - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गोंडवाना विद्यापीठाचे नॅकच्या टीमने केले मूल्याकंन

दि.18.09.2023
MEDIA VNI 
गोंडवाना विद्यापीठाचे नॅकच्या टीमने केले मूल्याकंन...
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात दिनांक १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर असे तीन दिवस राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या चमूने भेट देऊन पाहणी केली. 
या चमूने गोंडवाना विद्यापीठातील सर्व प्रशासकीय विभाग, परीक्षा विभाग, पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील सर्व विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, मुलामुलींचे वस्तीगृह, सोलर सिस्टीम, स्पार्क अभ्यासक्रमा विषयी सर्च चातगाव, टाटाचे स्किल सेंटर,अल्फा अकॅडमी तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. तसेच विद्यापीठाचे भविष्यातील फ्युचर प्लान काय आहेत याविषयी माहिती देण्यात आली. विद्यापीठाचे पी पी टी द्वारे सादरीकरण कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. 
नॅक चमुच्या भेटीसाठी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. यामध्ये स्वागतगीत, सुगमगीत, गोंडी डान्स,लावणी, पोवाडा नाटक, एकांकिका असे विविधांगी कार्यक्रम सादर करण्यात आले.
शेवटच्या दिवशी नॅकच्या चमूने विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण ही केले.
नॅक मूल्याकनासाठी जे निकष आवश्यक असतात त्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रंशात बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. विद्यापीठ स्थापने नंतर कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे नॅक मूल्याकन पार पडले. त्यासाठी विद्यापीठातील गुणवत्ता हमी कक्ष, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अविरत कार्यरत होते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे हा महत्त्वाचा मुद्दा असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने विद्यापीठाचे नॅक मूल्याकंन होणे आवश्यक होते. त्या दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठात  नॅक चमुची भेट महत्त्वपूर्ण ठरली.
अध्यापन - अध्ययन पद्धतींचे नियतकालिक मूल्यांकन करणे, स्वायत्तता, स्व-मूल्याकंन ,नाविन्यपूर्ण उपक्रम या संकल्पनाना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी  संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणे.  लाभार्थ्यांच्या सहयोगाने व त्यांच्या अभिप्रायानुसार कार्यामध्ये सुधारणा करणे. याद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये 'उत्कृष्टतेचा शोध ' विकसित करणे, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात शिकण्यास मदत करण्याचे कार्य नॅक करते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->