दि. 16.09.2023
गोंडवाना विद्यापीठात नॅक मूल्याकनाबाबत महाविद्यालयाचे अध्यक्ष,सचिव, प्राचार्य यांची सभा संपन्न
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात परिस - स्पर्श योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयातील अध्यक्ष, सचिव, प्राचार्य यांची सभा आज गोंडवाना विद्यापीठात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे,प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, अधिष्ठाता मानव विद्याशाखा डॉ.चंद्रमौली यांची उपस्थिती होती. यावेळी नॅक मूल्यांकनासाठी येणाऱ्या अडचणींवर कसे मात करता येईल यावर चर्चा करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला अनुपस्थित राहणाऱ्या संस्था चालकांना सक्त ताकीद देऊन कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे.विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन तसेच पुनमूल्यांकन झालं नसेल त्या महाविद्यालयाची संलग्नता संपुष्टात येईल. नॅक मूल्याकनात काही अडचणी असतील तर त्यात विद्यापीठ मदत करेल त्यासाठी विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाकडून अडचणी सोडवण्यात येतील. तसेच एक लाख रुपयाचे अनुदान व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर संबंधित नॅक मूल्यांकन करणाऱ्या महाविद्यालयांना देण्यात येईल
असे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे.
त्यामुळे महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मूल्यांकन प्रक्रिया सोपी करणं, येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करणं याचा अभ्यास करून विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाकडून मदत मिळेल असेही ते म्हणाले.
सभेचे संचालन आणि आभार अधिष्ठाता मानव विज्ञान विद्या शाखा डॉ.चंद्रमौली यांनी केले.