दि. 28.09.2023
कौशल्ययुक्त कामाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना भविष्यात रोजगाराच्या उत्तम संधी;आ. डॉ देवरावजी होळी
- कोनसरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन...
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता कौशल्य विकास प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत असून ज्यांच्याकडे कौशल्ययुक्त कामाचे प्रशिक्षण असेल भविष्यात त्यांनाच रोजगाराच्या उत्तम संधी मिळणार असल्याने या प्रशिक्षणाचा योग्य लाभ प्रशिक्षणार्थी यांनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोनसरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे अधिकारी व संबंधीत प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कोनसरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले.
आजच्या काळात कौशल्य युक्त कुशल कामगारांची मोठी आवश्यकता आहे. त्याकरिता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोनसरी येथे होणाऱ्या मोठ्या लोह प्रकल्पासाठी जिल्ह्यातील कौशल्य प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांची आवश्यकता असून त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. त्याकरिता आवश्यक ते कौशल्य प्रशिक्षण उत्तम प्रकारे प्राप्त करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.