विद्यापीठातील लोकांनी केलेले सहकार्य कायम स्मरणात राहणारे : डॉ. अनिता लोखंडे - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

विद्यापीठातील लोकांनी केलेले सहकार्य कायम स्मरणात राहणारे : डॉ. अनिता लोखंडे

दि. 22.10.2023 
MEDIA VNI 
विद्यापीठातील लोकांनी केलेले सहकार्य कायम स्मरणात राहणारे  : डॉ. अनिता लोखंडे
- क्रीडा संचालक डॉ.अनिता लोखंडे यांना निरोप
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : पाच वर्ष विद्यापीठाच्या क्रीडा विभागात संचालक  म्हणून काम केले. काम करीत असतांना सहकारी वर्गाची मोठी मदत झाली. अडचणी येतात त्यावर आपणच उपाय शोधले पाहिजे कामाच्या बाबतीत सहकाऱ्यांनी केलेली मदत कायम स्मरणात राहणारी आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास सोयीचा झाला असे भावोद्गगार शारीरिक क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनी काढले. संचालक क्रीडा विभाग पदावरून त्या नुकत्याच  सेवानिवृत्त झाल्या. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने नूकताच त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, वित्त व लेखा अधिकारी सी. ए. भास्कर पठारे तसेच डॉ. अनिता लोखंडे यांचे यजमान माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, सगळ्यांचे भरभरून बोलणं हे लोखंडे मॅडमच्या कामाची पावती आहे. त्यांचा कामाप्रती सदा समर्पित भाव असायचा. पाच वर्षांतील त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे,असे ते म्हणाले.
या प्रसंगी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण म्हणाले, त्यांच्यात असलेली सहकार्याची वागणूक आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा असलेला सहभाग कौतुकास्पद आहे. मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. 
यावेळी डॉ. अनिता लोखंडे यांचा त्यांचे यजमान माजी जिल्ह्या क्रीडा अधिकारी मदन टापरे यांच्यासह मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सिनेट सदस्य सतीश पडोळे, सुधीर पिंपळशेंडे, वरिष्ठ लघुलेखक प्रशांत पुनवटकर,सा.प्रा.डॉ. रजनी वाढई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी तर आभार उपकुलसचिव डॉ.कामाजी देशमुख यांनी मानले.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->