दि. 11 ऑक्टोंबर 2023
MEDIA VNI
लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/एटापल्ली : लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे मौजा नेंडेर येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेंडेर येथे साजरा करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन संजय हिचामी(अध्यक्ष शाळा समिती नेंडेर) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी सिडाम मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेंडेर, प्रमुख पाहुणे म्हणून वेळदा अंगणवाडी शिक्षिका नेंडेर, पालक बारसु हिचामी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात गावातील गावकरी तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाणचे अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी ११ ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांसमोरील आव्हाने आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करणे. समाजातील लिंग-भेद, स्त्रीभ्रृण हत्या, बालविवाह, हिंसाचार, पूर्वीच्या काळी बालविवाह प्रथा, सती प्रथा, हुंडा प्रथा, यांसारख्या सनातनी प्रथा प्रचलित होत्या. या कारणास्तव मुलींना शिक्षण, पोषण, कायदेशीर हक्क यांसारख्या गोष्टी नाकारल्या गेल्या. मात्र, आता या आधुनिक युगात मुलींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.