दि. 31.10.2023
मुंबई-पुणे हायवेवर रुग्णवाहिकेचा भयानक स्फोट, गाडीच्या चिंधड्या, महिला जागीच ठार ! बघा व्हिडिओ...
मीडिया वी.एन.आय :
मुंबई : रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना रुग्णवाहिकेचा भयानक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पुणे महामार्गावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला.
या घटनेत रुग्णवाहिकेतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले सुदैवाने बचावले. रुग्णाला उपचारासाठी नेले जात असतानाच असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कसा झाला अपघात...
मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक झाला.ॲम्बुलन्स एका महिलेला पुण्याच्या दिशेने जात असताना अचानक रुग्णवाहिकेला आग लागली. यात एका रुग्ण महिला आणि चालकासह एकूण आठजण होते. यातील चालक आणि इतर रुग्णाचे नातेवाईक बाहेर पडले. मात्र, महिला आताच राहिली, त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव नीलववा कवलदार असे आहे.
या घटनेतील दुर्दैवी महिला ही अत्यवस्थ असल्याने तिला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्ट वर गुलबर्गा कर्नाटक येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला. रुग्णवाहिकेमधील सहा नातेवाईक एक पेशंट एक महिला डॉक्टर आणि चालक असे सर्वजण होते. त्यातील ती दुर्दैवी महिला मृत पावली आहे.
घटनास्थळी वेळीच वाहतूक पोलीस यंत्रणेचे पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल लोकमान्य रुग्णवाहिका सेवा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य पोहचले होते. ऑपरेशन सुरू असताना रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडरचे स्फोट झाले, यात आतील महिला मृत्यू पावली तर इतर वेळीच खाली उतरल्याने सुदैवाने वाचले, तर बचाव कार्यात असणारे पोलीस कर्मचारी आणि बचाव दलातील सदस्य बचावले. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन (दुचाकी) जळून खाक झाली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबई पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा स्फोट, एक महिला जागीच ठार#accident #mumbaipunehighway pic.twitter.com/4rHNDIfcD0
— News18Lokmat (@News18lokmat) October 31, 2023