Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना घेऊन दुसरं विमान दिल्लीत दाखल! दोन लहान मुलांसह 235 जणांचा समावेश - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना घेऊन दुसरं विमान दिल्लीत दाखल! दोन लहान मुलांसह 235 जणांचा समावेश

दि. 14 ऑक्टोंबर 2023 

MEDIA VNI 

Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना घेऊन दुसरं विमान दिल्लीत दाखल! दोन लहान मुलांसह 235 जणांचा समावेश

मीडिया वी.एन.आय : 

इस्राइल आणि हमास यांच्यात गेले आठवड्यापासून जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे 3,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्राइलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले आहे.

याअंतर्गत इस्राइलमधून भारतीयांची दुसरी खेप शनिवारी सकाळी दिल्लीत पोहोचली. यामध्ये दोन अर्भकांसह 235 लोकांचा समावेश आहे. 212 भारतीयांचा पहिला गट शुक्रवारी सकाळी भारतात पोहोचली होती.

भारतीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी इस्त्राइलमधून भारताकडे निघालेल्या नागरिकांमध्ये 235 भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. विमानाने तेल अवीव येथून रात्री 11.02 वाजता उड्डाण केले. भारतीय दूतावासाने सांगितले की, दूतावासाने तिसर्‍या बॅचमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांना ईमेलद्वारे कळवले आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी लोकांना पुन्हा मेसेज केला जाईल.

इस्त्राइलमध्ये काय सुरू आहे?

इस्राइलमध्ये जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या मुद्द्यावर हे वातावरण पेटलं आहे. इस्त्राइलवर करण्यात आलेल्या हल्ला हा मशिदीला अपवित्र केल्याचा बदला असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने की इस्राइली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकल्याचे म्हटले आहे. इस्राइलचे सैन्य हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्राइली सैन्य महिला आणि मुलांवर हल्ले करत असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्या हमासचे प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे. 


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->