दि. 17 ऑक्टोंबर 2023
मागासवर्गीयांसाठी असलेली मार्गदर्शिका विद्यार्थ्यांसाठी अमूल्य ठेवा : कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे
- मार्गदर्शिका नागरिकांना लोकार्पित
- गोंडवाना विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने मागासवर्गीयांसाठी असलेली मार्गदर्शिका प्रकाशित केली.विद्यार्थ्यांना शासकीय योजना विषयी कुठलीही शैक्षणिक समस्या असेल तर त्याच उत्तर ही मार्गदर्शिका आहे. या मार्गदर्शिकेत विद्यापीठाच्या समितीचे मोठे योगदान आहे.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी या मार्गदर्शिके साठी पुढाकार घेतला. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.मागासवर्गीयांसाठी असलेली ही मार्गदर्शिका विद्यार्थ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे असा विश्वास कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात काल गोंडवाना विद्यापीठाची मागासवर्गीयांसाठी उपयोगी असलेली मार्गदर्शिका लोकार्पित तसेच वितरित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, तर मुख्य अतिथी म्हणून राज्याचे वने व सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे तसेच कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर काल झालेल्या
धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात गोंडवाना विद्यापीठाची मागासवर्गीयांसाठी उपयोगी असलेली मार्गदर्शिका उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली .यावेळी विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह होता. ही मार्गदर्शिका घेण्यासाठी नागरिकांनी गोंडवाना विद्यापीठाच्या स्टॉल वर गर्दी केली होती.
या मार्गदर्शिकेत मागासवर्गीयांसाठीच्या सर्व शासकीय योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध शिष्यवृत्ती व
फेलोशिप, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी सुवर्णपदके पारितोषिक, महाराष्ट्र ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्टे व कार्ये,गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यृत्ती मंजूर करण्याबाबत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, सर्व शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी असलेल्या आरक्षणात सुधारणा करण्याबाबत, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याबाबत इत्यंभूत माहिती आहे.
मार्गदर्शिकेच हे पहिलेच वर्ष आहे.