मलेरियाच्या उपचारासाठी 'या' व्हॅक्सिनचा वापर करा; WHOच्या सूचना... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

मलेरियाच्या उपचारासाठी 'या' व्हॅक्सिनचा वापर करा; WHOच्या सूचना...

दि. 3 आक्टोंबर 2023 

MEDIA VNI 

Malaria : मलेरियाच्या उपचारासाठी 'या' व्हॅक्सिनचा वापर करा; WHOच्या सूचना...

WHO Recommends Vaccine For Malaria: 

मीडिया वी.एन.आय : 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने लहान मुलांमध्ये मलेरियाचा नायनाट कऱण्यासाठी नविन व्हॅक्सिन वापरण्याचा सल्ला दिला आहे. R-21 म्हणजेच मॅट्रीक्स-एम या व्हॅक्सिनचा वापर मलेरियाग्रस्त लहान मुलांच्या उपचारामध्ये करावा, असं WHOच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

WHOच्या स्ट्रॅटजिक एडवायजरी ग्रुप ऑफ एक्स्पर्ट्स (SAGE) आणि मलेरिया पॉलिसी एडवाजरी ग्रुप (MPAG)ने या सूचना जाहीर केल्या आहेत. WHOची द्विवार्षिक बैठक २५ ते २९ सप्टेंबर या दरम्यान पार पडली. या बैठकीत त्यांनी SAGE आणि MPAGने दिलेल्या सल्ल्यांना मान्यता दिली.

WHOने मलेरिया बरोबरच मेनिंजाईटीस (Meningitis) आणि डेंग्यू यांसारख्या रोगांवर देखील नवीन लस वापरण्याच्या सूचना SAGEच्या सल्ल्यावरुन दिल्या आहेत. पोलियोचा नायनाट करण्यासाठी IA2030 लशीचा वापर वाढवावा असं सांगण्यात आलं.

WHOकडून सुचवण्यात आलेली R-21 ही दुसरी लस आहे. याआधी RTS,S/AS01 ही लस मलेरियासाठी देण्यात येत होती, २०२१मध्ये ही लस वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. WHOने सुचवलेल्या लशी लहान मुलांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक आहेत. जेव्हा या लशीमुळे लोकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम बघायला मिळाला होता.

मलेरिया हा मच्छारांमुळे उद्भवणारा रोग आहे. आफ्रिकन देशांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. येथील सुमारे ५ लाख लहान मुलं या रोगामुळे जीव गमावतात. असे WHOकडून प्रकाशित करण्यात आले होते.

या देशांमध्ये मलेरियाच्या लशींची मागणी जास्त आहे. मात्र, या लशींचा पुरवठा मर्यादित आहे.WHOने शिफारस केलेल्या मलेरिया लशींच्या यादीत R21 समाविष्ट केल्यामुळे ज्या ठिकाणी मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा ठिकाणी पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->