झिम्बाब्वेमध्ये विमान अपघात, भारतीय उद्योगपती आणि त्यांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

झिम्बाब्वेमध्ये विमान अपघात, भारतीय उद्योगपती आणि त्यांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू.!

दि. 2 ऑक्टोंबर 2023

MEDIA VNI 
झिम्बाब्वेमध्ये विमान अपघात, भारतीय उद्योगपती आणि त्यांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू.!

मीडिया वी.एन.आय : 

झिम्बाब्वे : आफ्रिकन देश झिम्बाब्वेमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या अपघातात एक भारतीय व्यापारी आणि त्याच्या मुलाचाही समावेश आहे.

वृत्तानुसार, दक्षिण-पश्चिम झिम्बाब्वेमध्ये एका खाजगी विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हिऱ्याच्या खाणीजवळ त्याचा अपघात झाला. या अपघातात विमानातील भारतीय खाण व्यावसायिक आणि त्यांच्या मुलासह 6 जणांचा मृत्यू झाला.

‘आयहरारे’ या न्यूज वेबसाईटने आपल्या बातमीत म्हटले आहे की, मशावा येथील जवाम्हंडे भागात झालेल्या विमान अपघातात ‘रायोझिम’ खाण कंपनीचे मालक हरपाल रंधवा, त्यांचा मुलगा आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला. ‘रियोझिम’ ही सोने आणि कोळसा तसेच निकेल आणि तांबे यांचे शुद्धीकरण करणारी प्रमुख खाण कंपनी आहे. वृत्तानुसार, ‘रियोझिम’ च्या मालकीचे सेसना 206 विमान शुक्रवारी हरारेहून मुरोवा हिऱ्याच्या खाणीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला.

हिरा खाणीजवळ अपघात झाला
सिंगल इंजिन असलेले विमान मुरोवा हिऱ्याच्या खाणीजवळ कोसळले. त्याचा सह-मालक ‘रयोजिम’ आहे. वृत्तानुसार, जवाम्हंडे येथील पीटर फार्म येथे विमान पडण्यापूर्वी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याचा हवेत स्फोट झाला असावा. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द हेराल्ड’ वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अपघातात ठार झालेले चार जण परदेशी होते, तर इतर दोघे झिम्बाब्वेचे नागरिक होते. पोलिसांनी अद्याप मृतांची नावे जाहीर केलेली नाहीत, परंतु रंधावा यांचे मित्र आणि व्यावसायिक पत्रकार आणि चित्रपट निर्माते होपवेल चिनोनो यांनी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->