गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

दि. 2 ऑक्टोंबर 2023
MEDIA VNI 
गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...
- विविध पुरस्काराचे करण्यात आले वितरण
गोंडवाना विद्यापीठ समाजातील लोकांना जोडणारे विद्यापीठ आहे : डॉ. सतीश गोगुलवार
मीडिया वी.एन.आय :    
गडचिरोली : लोकांचे जंगलांचे अधिकार संपायला आले होते. खऱ्या अर्थाने आदिवासी आणि वनवासी यांचे अधिकार नष्ट व्हायला लागले होते. मेंढालेखा गावाला पहिले सामूहिक अधिकार प्राप्त झाले. आता बऱ्याच गावांना सामूहिक अधिकार मिळाले.ग्रामसभांना समृद्ध करण्यासाठी एकल प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या संकल्पनेने सुरु झाला. कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठ नॉलेज पार्टनर म्हणून काम करत आहे. स्थानिक लोकांचा एकल प्रशिक्षणचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विद्यापीठाने संधी दिली. यात १०० गावातील तरुण-तरुणी सहयोगी म्हणून काम करू लागले. सरळ विद्यापीठ गावातील लोकांशी जोडले गेले. गोंडवाना विद्यापीठ हे समाजातील लोकांना जोडणारे विद्यापीठ आहे. असे प्रतिपादन जीवन साधना गौरव पुरस्कार प्राप्त आम्ही आमच्या आरोग्यासाठी, संयोजक डॉ. सतीश गोगुलवार यांनी जीवन साधना गौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर केले.यावेळी पत्नी शुभदा देशमुख यांच्यासह सत्कार करण्यात आला.
२ ऑक्टोबर २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाने १२ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत १३ व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने विविध पुरस्काराचे वितरण, परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज भवनाचे लोकार्पण तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. आज महाराजा सेलिब्रेशन हॉल ऍन्ड लॉन, माडीया तुकुम, धानोरा रोड, सिटी हार्ट हॉटेल जवळ, येथे वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्या शाखा डॉ. चंद्रमौली, वित्त व लेखा अधिकारी डॉ. भास्कर पठारे, व्यस्थापन परिषदेचे सदस्य श्री. प्रशांत मोहिते,डॉ.संजय गोरे,  श्री.स्वप्नील दोंतूलवार डॉ. प्राचार्य लेमराज लडके, डॉ.विवेक गोर्लवार, श्री.गुरुदास कामडी, श्री.प्रशांत दोंतुलवार,डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. रंजना लाड आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर व्हावे : आ. डॉ. देवराव होळी

गोंडवाना विद्यापीठाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी या विद्यापीठाला दिला आहे, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो.
आदिवासी नक्षलग्रस्त भागातील गोंडवाना विद्यापीठात महामहिम राष्ट्रपती आल्या आणि विद्यापीठाच्या विकासाची हमी त्यांनी दिली. डॉ सतीश गोगुलवर यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला याबाबत त्यांचे अभिनंदन करतो.या पुरस्कारामूळे विद्यार्थ्यांच्या मनात समाजसेवेची भावना जागृत होईल.मेरा देश मेरी मिट्टी या उपक्रमाच्या माध्यमातून देशात राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम निर्माण होत आहे, राष्ट्रभाव निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत आहेत आझादी के अमृत महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात, गावात, विभागात 75 वृक्ष लावायचे आहे, हे वृक्ष फोटो पुरती न ठेवता ते 75 वर्षे कसे टिकेल याची काळजी घेतली पाहिजे हे अभियान प्रत्येक गावापर्यंत पोहचविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर विद्यार्थी होणे गरजेचे आहे.

विद्यापीठाने आश्रमशाळांना दत्तक घ्यावे: जिल्हाधिकारी संजय मीणा

विद्यापीठाने इंजिनिअरिंग शाखा सुरू करावी. विद्यापीठ विकासासाठी मी सदैव तत्पर आहे. जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळा आहे. विद्यापीठ आपल्या गावात उपक्रम जसा राबवित आहे तसेच काही सेंटर विद्यापीठाने आश्रम शाळेत द्यावे. त्यांचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल असे ते म्हणाले.

मागास जिल्हा ही ओळख पुसून विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय स्तरावर येईल : डॉ प्रशांत बोकारे

विद्यापीठाच्या निर्णयात व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, आधीसभा यांचा महत्वाचा वाटा आहे. विद्यापीठाच्या प्रगती साठी असलेल्या कुठल्याही निर्णयात आडकाठी  येत नाही. नुकत्याच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लॉयड मेटल्स आणि त्रिवेणी या दोन कंपन्यांसाठी मुलाखती दिलेल्या आहेत. त्यातून काही विद्यार्थ्यांची निवड होण्याची शक्यता आहे या बारा वर्षाच्या कार्यकाळात शासनाने निधीची कमतरता पडू दिली नाही. एकल प्रकल्पा अंतर्गत आतापर्यंत 259 ग्रामसभांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. ग्रामसभा कशा  सक्षम होईल. येथील जिल्ह्याचा कसा विकास होईल. या साठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची मागास ही  ओळख मिटून जिल्ह्या बरोबरच विद्यापीठाचे नाव राष्ट्र स्तरावर जाईल. असा आशावाद कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला.
"मेरी माटी मेरा देश" या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी संजय मीणा यांना रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, यांच्या हस्ते अमृत कलश सुपूर्द करण्यात आला.
डॉ.सतीश गोगुलवार यांच्या मानपत्राचे वाचन डॉ. सविता सादमवार यांनी केले. मागासवर्गीयांसाठी उपयोगी असलेल्या विद्यापीठ मार्गदर्शिकेच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी, मनोगत रासेयो संचालक डॉ श्याम खंडारे, संचालन, डॉ. शिल्पा आठवले तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, व्यस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद ,सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


◆ जीवन साधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्काराचे वितरण 
आम्ही आमच्या आरोग्यासाठी तथा सामाजिक कार्यकर्ता, कुरखेडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली संयोजक डॉ. सतिश वसंतराव गोगुलवार,

उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार
छत्रपती नगर, तुकूम, चंद्रपूर जि. चंद्रपूर,अधिसभा सदस्य संजय बलवंतराव रामगीरवार

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
निलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती,

उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
प्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, डॉ. प्रमोद मुर्लीधर काटकर,

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय)
आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) ता. वडसा जि. गडचिरोली , सहयोगी प्राध्यापक, डॉ. हितेंद्र धोटे,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ३ (विद्यापीठ)
निम्नश्रेणी लिपीक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,  भिमराव ज्योतिराव उराडे,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ३ (महाविद्यालय)
प्रयोगशाळा सहाय्यक जनता महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, प्रशांत बाजीराव रंदई,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ४ (महाविद्यालय)
प्रयोगशाळा परिचर जनता महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, योगिता प्रकाश रायपुरे,

उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार
आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपूर, अभिजित किसन अष्टकार,

उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार
गोविंदराव मूनघाटे कला व विज्ञान महाविद्याल, कुरखेडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली ,डिंपल रमेश बोरकर

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार ,  कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक  डॉ. पवन नाईक यांचा शाल, श्रीफळ तसेच विद्यापीठाचे संचालक डॉ. श्याम खंडारे , प्राचार्य ,केवळरामजी हरडे महाविद्यालय ,चामोर्शी डॉ.हिराजी बनपूरकर आदींना पुरस्कार वितरीत करण्यात आले.


◆ शैक्षणिक सत्र २२-२३ आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक पुरस्कार

प्रथम पुरस्कार- शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा ,जिल्हा चंद्रपूर 

द्वितीय -केवळ रामजी हरडे महाविद्यालय,चामोर्शी,जिल्हा गडचिरोली

तृतीय - गोविंदराव मुनघाटे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज कुरखेडा, जिल्हा  गडचिरोली

उत्तेजनार्थ - सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर,
कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी, जिल्हा गडचिरोली

शिक्षण सत्र 22 -23 उत्कृष्ट विद्यार्थी विकास कार्यक्रमधिकारी पुरस्कार
 डॉ. पवन रमेश नाईक केवळ रामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, जिल्हा गडचिरोली

उत्कृष्ट चॅम्पियन महाविद्यालय 
आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा ,जिल्हा चंद्रपूर

◆ उत्कृष्ट रासेयो  महाविद्यालय एकक पुरस्कार

शरदचंद्र पवार कला वाणिज्य महाविद्यालय, गडचादुर, जिल्हा चंद्रपूर( विद्यापीठ स्तरीय)

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी ,जिल्हा गडचिरोली 

उत्कृष्ट रासेयो  कार्यक्रम अधिकारी पुरस्कार 
डॉ.शरद बेलोरकर ,शरदचंद्र पवार कला वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर ,जिल्हा चंद्रपूर
( विद्यापीठ स्तरीय)

 डॉ  राज मुसणे , महात्मा ज्योतिबा फुले , महाविद्यालय आष्टी,  जिल्हा गडचिरोली (जिल्हास्तरीय )

उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक  पुरस्कार 
अरबाज शेख ,केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी ( विद्यापीठ स्तरीय)

प्रज्वल बोबडे ,श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय राजुरा ,जिल्हा चंद्रपूर

Share News

copylock

Post Top Advertisement

-->