दि. 1 आक्टोंबर 2023
गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना द्वारा 'स्वच्छता हीच सेवा' मोहीम संपन्न.
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ परिसरात 'स्वच्छता हीच सेवा' या मोहीमे अंतर्गत विद्यापीठ परिसर स्वच्छ करून श्रमदान करण्यात आले. या मोहीमेचे नेतृत्व कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वात प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण,संचालक रासेयो विभाग डॉ. श्याम खंडारे, सिआरपीएफ चे डेप्युटी कमांडन्ट प्रजनिश कुमार, डेप्युटी कमांडन्ट नवीन प्रिष्ट यांच्या सह विद्यापीठातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सिआरपीएफ जवान आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांचे स्वागत एनएसएस क्लॅपने करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छताही सेवा ही मोहिम राबविण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. त्या मोहिमेला प्रतिसाद देत रविवारी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवणे
ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपल्या विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. स्वच्छ परिसरात मन प्रसन्न राहते.
प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डेप्युटी कमांडन्ट रजनीश कुमार यांनीही स्वच्छतेच्या सवयी पळून आदर्श जीवन जगू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी सर्वांना पंचप्राण शपथ दिली. तसेच सर्वांनी अमृत कलश मध्ये माती समाविष्ठ केली.
एक तास हे अभियान गोंडवाना विद्यापीठ परिसर, मॉडेल कॉलेज, विद्यापीठाच्या सभोवताली राबविण्यात आले. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह सर्व संविधानिक अधिकारी, विद्यापीठाचे सर्व विविध विभागामधील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, सिआरपीएफ जवान तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
या स्वच्छता मोहीमेच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे यांनी परिश्रम घेतले.