गोंडवाना विद्यापीठात होणार आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

गोंडवाना विद्यापीठात होणार आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन...

दि. 5 ऑक्टोंबर 2023
MEDIA VNI 
गोंडवाना विद्यापीठात होणार आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन
- सदर अध्यासन केंद्राला शासनाचे तीन कोटी मंजूर
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने  राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठवला होता. त्या बाबत शासनाने  बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला मंगळवार (दि.३)रोजी मंजुरी दिली आहे.  
आदिवासी अध्यासनासाठी तीन कोटी मंजूर  केल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
आदिवासी बांधवांना समान संधी 
उपलब्ध करून देणे आणि उपेक्षित आदिवासी समाजाचे मानवी विकास सुनिश्चित करण्याचे ध्येय गोंडवाना विद्यापीठाने पुढे ठेवले आहे. त्यामुळे आता गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

आदिवासी अध्यासन केंद्राचे स्वरूप
आदिवासींना घटना (५, ६ वी अनुसूची) आणि आदिवासींची संबंधित जमीन व वन कायदे समजून घेणे, आदिवासींचे कायदे समजून घेणे, आदिवासी विकास योजना अर्थसंकल्प वाटप समजुन घेणे, आंतरराष्ट्रीय व देशातील कायदे व आंतरराष्ट्रीय संधी यातील प्रश्न जाणून घेणे, पारंपरिक शासन व प्रथा अधिकार (सामान्य आदिवासी बांधवांना समान संधी मालमत्ता संसाधने) च्या मुद्यांचा अभ्यास, आदिवासी कायदा अंमलबजावणीचा अहवाल क्षेत्रात विकसित करणे, इत्यादी बाबींवर सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे अध्यासन केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.
हे अध्यासन केंद्र विद्यापीठाला मंजूर होण्यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे आणि  कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला.
"गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरू व्हावे यासाठी शासन दरबारी २०१७-१८पासून  सतत पाठ पुरावा केला.२०२१-२२ मध्ये परत नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली.
तरीही ही मान्यता मिळण्याच्या अगोदर विद्यापीठाच्या सामान्य फंडातून हे अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले होते. आता शासनाने दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी तीन कोटीचा निधी मंजूर केला.त्यातून मिळणाऱ्या व्याजातून हे अध्यासन केंद्र चालेल".
- डॉ.श्रीराम कावळे
प्र-कुलगुरु , गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

Share News

copylock

Post Top Advertisement

-->