दक्षिण भारतातून भाजप, तर हिंदी भाषिक राज्यातून काँग्रेस हद्दपार; दोन्हीमध्ये अवघा महाराष्ट्र निर्णयासाठी उभा! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

दक्षिण भारतातून भाजप, तर हिंदी भाषिक राज्यातून काँग्रेस हद्दपार; दोन्हीमध्ये अवघा महाराष्ट्र निर्णयासाठी उभा!

दि. 03.12.2023

MEDIA VNI 

दक्षिण भारतातून भाजप, तर हिंदी भाषिक राज्यातून काँग्रेस हद्दपार; दोन्हीमध्ये अवघा महाराष्ट्र निर्णयासाठी उभा!

Assembly Election Results 2023 : Rajasthan, Chhattisgarh, Madhya Pradesh, Telangana.!

मीडिया वी.एन.आय : 

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3-1 ने बाजी मारताना आगामी लोकसभेला किमान 82 जागांसाठी पोषक वातावरण तयार केलं आहे. भाजपने चारपैकी हिंदी भाषिक असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवला आहे.

यामध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तांतर करत भाजपने सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या हिंदी भाषिक राज्यामध्ये भाजपने आपला दावा मजबूत केला आहे. मात्र, दुसरीकडे, कर्नाटक तेलंगणात सुद्धा भाजपची झोळी रिकामी राहिल्याने उत्तर भारतातून भाजप हद्दपार झाला आहे.

दक्षिण भारतात भाजप हद्दपार, उत्तर भारतात काँग्रेस हद्दपार!

उत्तर भारतामध्ये केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडून बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. मात्र, पहिल्यांदा कर्नाटक आणि आता तेलंगणा अशा दोन राज्यांनी भाजपचा डाव धुळीस मिळवला आहे. या दोन्ही राज्यात काँग्रेसने सत्ता मिळवताना दक्षिणेकडील स्थान अधोरेखित केलं आहे. त्यामुळे उत्तर भारतातून काँग्रेस हद्दपार अन् दक्षिणेतून भाजप हद्दपार अशी स्थिती दोन प्रमुख पक्षांची झाली आहे.

उत्तर भारतात एकट्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. याशिवाय बिहार (40), मध्य प्रदेश (29), राजस्थान (25) आणि हरियाणा (10) या राज्यांचा विचार केल्यास लोकसभेच्या जागांची संख्या 184 वर पोहोचते. 184 चा हा आकडा सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या 273 जागांपेक्षा मोठा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की जनमत अजूनही पंतप्रधान मोदींच्या बाजूने आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतातील 184 पैकी 141 जागा एकट्या भाजपच्या वाट्याला गेल्या. गुजरातमधील 26 पैकी 26, दिल्लीतील 7 पैकी 7, हिमाचलमधील 4 पैकी 4 आणि महाराष्ट्रातील 48 पैकी 23 जागा जोडल्यास भाजपला 201 जागा मिळाल्या.

यावेळी महाराष्ट्रात काय होणार?

चारपैकी तीन राज्यातील विजयाने भाजपला 82 जागांवर आत्मविश्वास आला असला, तरी महाराष्ट्रात राजकारणाची झालेली खिचडी पाहता यावेळी भाजपसमोर तगडं आव्हान असणार आहे. आज भाजप सत्तेत असला, तरी सर्वाधिक मर्जी अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाची सांभाळावी लागत आहे. येत्या लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट मुकाबला असेल. त्यामुळे 2019 ची पुनरावृत्ती लोकसभा आणि विधानसभेला होईल की नाही? याबाबत कोणतीही श्वाश्वती नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून 27 महानगरपालिका, 230 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. अजून दोनच महिन्यांनी काही महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडून तब्बल चार वर्ष झालेली असतील. यावरून महाराष्ट्रातील स्थितीचा अंदाज येतो.

दक्षिण भारताचा विचार करता, कर्नाटक व्यतिरिक्त भाजपला फक्त कर्नाटक (28 पैकी 25) आणि तेलंगणात (17 पैकी 4) जागा मिळाल्या. यावेळी कर्नाटकानंतर तेलंगणात काँग्रेसचा बंपर विजय या दोन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी होऊ शकतात तर काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->