माझी शाळा माझी परसबाग उपक्रमांतर्गत सजली शाळेत परसबाग - प्रविण मुंजमकर - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

माझी शाळा माझी परसबाग उपक्रमांतर्गत सजली शाळेत परसबाग - प्रविण मुंजमकर

दि. 09.12.2023 
MEDIA VNI 
माझी शाळा माझी परसबाग उपक्रमांतर्गत सजली शाळेत परसबाग - प्रविण मुंजमकर 
मीडिया वी. एन.आय : 
गडचिरोली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडधा येथे माझी शाळा माझी परसबाग या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे विशेष धडे मिळावे, त्यांच्यात श्रममुल्याचा विकास व्हावा, आणि सेंद्रिय शेती तसेच रासायनिक शेती नफा आणि तोटा या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे, याकरिता शालेय परिसरामध्ये परसबाग फुलविण्यात आली. माहे जून महिन्यामध्ये परस बागेची जागा निश्चित करून ते त्याची मशागत करण्यात आली. परस बागेचे मार्गदर्शन करण्याकरिता तज्ञ मार्गदर्शकांना बोलावून परस बागेची आखणी करण्यात आली. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पितांबर गायकवाड आणि सर्व सदस्य यांचे विशेष योगदान लाभले. शाळेचे मुख्याध्यापक मनीष होळी यांच्या सहकार्याने व प्रवीण यादव मुंजमकर (शिक्षक) यांच्या संकल्पनेतून ही परसबाग साकारण्यात आली. या परसबागेमध्ये सौ. उषा बंडू सीडाम, नितीन परशुरामकर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी, सहावी, सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांकडून परत बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामांचे वाटप करून कामे करण्यात आली. परसबागेमध्ये चवळी, पालक, मेथी, सांबार, कोबी, टमाटर, वांगी, मिरची, कढीपत्ता अशा प्रकारच्या विविध फळभाज्या आणि फुलबाज्याची लागवड करण्यात आली. तीन महिने या परसबागेची योग्य सेंद्रिय खत आणि पाणी देऊन काळजी करण्यात आली. तीन महिन्यानंतर या परस बागेतून पालक, मेथी, सांबार, कोबी, मिरची, टमाटे इत्यादी काढण्यात येऊन त्याचा उपयोग मध्यान भोजनामध्ये करण्यात येत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद तसेच स्वतः कमावलेल्या भाज्यांची आवड निर्माण झाली. शेतीसाठी प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला. विद्यार्थी जिव्हाळ्याने परस बागेत काम करतात. कार्यानुभवाच्या तासिकेला जेवनाच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी परस बागेची देखभाल करीत असतात. यामुळे श्रममुल्य निर्माण झाले. असा हा परसबाग हा उपक्रम सर्व शाळेमध्ये राबवावा अशा प्रकारचा आहे. सगळीकडे जिल्हा परिषद शाळा बोडदा यांनी राबवलेल्या या परसबागेचे कौतुक करण्यात येत आहे.

- लेखन : प्रविण यादव मुंजमकर ( शिक्षक)
              देसाईगंज वडसा - गडचिरोली.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->