Tanushri Punekar vs Gautami Patil: नव्या गौतमीने मार्केट केलं जाम; दिसायला अगदी सेम टू सेम.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Tanushri Punekar vs Gautami Patil: नव्या गौतमीने मार्केट केलं जाम; दिसायला अगदी सेम टू सेम.!

दि. 09.01.2024

MEDIA VNI 

Tanushri Punekar vs Gautami Patil: नव्या गौतमीने मार्केट केलं जाम; दिसायला अगदी सेम टू सेम.!

Dancer Tanushri Punekar : 

मीडिया वी.एन.आय :

डॉन्सर गौतमी पाटीलने तिच्या नृत्याने प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. गौतमी पाटीलने तिच्या अदा आणि डान्सने शहर आणि खेड्यांमधील तरुणांना वेड लावलं आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मराठी सेलिब्रिटीमध्ये गौतमीचे नाव घेतलं जात आहे.

याचदरम्यान, गौतमी सारख्या दिसणाऱ्या एका नव्या डान्सरने नृत्य क्षेत्रात एन्ट्री केली आहे. ही नवीन डान्सर दिसायला सेम टू सेम गौतमी सारखीच आहे. गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरने फार कमी कालावधित मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. (Latest Marathi News)

गौतमीची 'डुप्लिकेट कॉपी'

गौतमी पाटीलने 'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरू', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'पाटलांचा बैलगाडा' या गाण्यांतून तरुणाईच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे. याच अनेकांच्या 'दिलो की धडकन' असणाऱ्या गौतमीची 'डुप्लिकेट कॉपी' मार्केटमध्ये आली आहे.

गौतमी सारखी दिसणारी डान्सर

गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरचं नाव आहे तनुश्री पुणेकर. तनुश्री ही लावणी कलाकार आहे. तनुश्री हुबेहूब गौतमी सारखी दिसते. तनुश्री फक्त गौतमी सारखी दिसत नाही, तर डान्स, अदाकारी, बोलणं अशा अनेक गोष्टी गौतमी सारख्या आहेत.

गौतमी सारखा तनुश्रीचाही राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमालाही मोठा चाहता वर्ग हजेरी लावतो. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. तनुश्रीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड पाहायला मिळते.

मला गौतमी म्हणू नका : तनुश्री पुणेकर

गौतमी सारख्या दिसणाऱ्या तनुश्रीला मात्र चाहत्यांनी 'डुप्लिकेट गौतमी' बोललेले अजिबात आवडत नाही. तिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना मनातील गोष्ट सांगितली.

तनुश्री म्हणाली की, 'सर्वांना विनंती आहे की, मला कुणीही गौतमी पाटील म्हणू नका. तसेच कोणीही 'डुप्लिकेट गौतमी' म्हणू नका. मी तनुश्री पुणेकर आहे. त्यामुळे मला तनुश्री पुणेकरच म्हणा. सर्वांच्या प्रेमाबद्दल आभारी आहे. असंच प्रेम देत राहा. धन्यवाद'.

गौतमी पाटीलचं मार्केट डाऊन होणार?

तत्पूर्वी, तनुश्रीला पाहण्यासाठी कधी कधी तर राडा सुद्धा होतो. आता तनुश्रीच्या एन्ट्रीने गौतमी पाटीलचं मार्केट डाऊन तर होणार नाही ना हे पाहावं लागेल.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->